24 April, 2023

 

दिव्यांग व्यक्ती विवाह प्रोत्साहन अनुदानाचे वाटप

                                                                                                             

            हिंगोली (जिमाका), दि.24 : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाद्वारे दिव्यांगांसाठी दिव्यांग-अव्यांग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहनपर अर्थसहाय्य या योजनेंतर्गत अनुदानाचे वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, प्रकल्प अधिकारी नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, अनंत कुंभार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांच्या हस्ते लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले.

            यावेळी सन 2022-23 साठी हिंगोली जिल्ह्यातील 20 विवाहित दिव्यांग जोडप्यांना प्रती लाभार्थी 50 हजार रुपयाप्रमाणे 10 लाख रुपयाचे अनुदान वितरीत करण्यात आले. त्यामध्ये 25 हजार रुपयाचा धनादेश व 25 हजार रुपयांची मुदतबंद पावती लाभार्थींना प्रदान करण्यात आली.

            समाजातील दिव्यांग व्यक्तींना विवाहामार्फत अंगीकार करणाऱ्या लाभार्थींना दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना शासनाच्या सामाजिक न्याय  विभागातर्फे राबविण्यात येते. दिव्यांग व्यक्ती या अनुदानासाठी चालू वर्षासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी केले आहे.

*****

No comments: