08 January, 2019

स्वच्छ सुंदर शौचालय जनजागृतीपर स्पर्धेत सहभागी व्हावे -डॉ. एच.पी. तुम्मोड





स्वच्छ सुंदर शौचालय जनजागृतीपर स्पर्धेत सहभागी व्हावे
-डॉ. एच.पी. तुम्मोड

हिंगोली, दि.8: स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाच्या पेय जल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने जिल्ह्यात स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा आयोजन करण्‌यात आले आहे. या अभियान स्पर्धेचा कालावधी 1 ते 31 जानेवारी, 2018  या काळात होणार असून, जास्तीत-जास्त नागरिकांनी सर स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये वैयक्तीक शौचालयाचा नियमित वापर व्हावा ग्रामीण भागात स्वच्छतेची संस्कृती रुजावी या उद्देशाने ही देशभरात ही स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेत गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या शौचालयाला नव्याने रंग देऊन स्वत:च्या कल्पकतेने संदेश  देऊन लिहून शौचालय आकर्षित करुन, याकामी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण लोगो नागरिकांना वापरता येणार आहे. त्यासाठी कुटुंबियांनी स्वत: खर्च करावयाचा आहे. याकरिता सिएसआर व विविध शासकीय योजनेचा समन्वय साधला जावू शकतो. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात रंबविलेल्या शौचालयाच्या टक्केवारीनुसार राज्यातील तीन शौचालयाचे छायाचित्र राज्यातील तीन उत्कृष्ट जिल्हे निवडले जाणार असून सदर छायाचित्र राज्यस्तरावर पाठवावयाचे आहे. सदरील छायाचित्र, गाव व तालुका यांची माहिती 31 जानेवारी रोजी पाणी व स्वच्छता संस्था, मुंबई यांचेकडे पाठविणे आवश्यक आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी एम. पी. पोहरे यांनी केले आहे.

****


ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी




ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी
-जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

हिंगोली, दि.8: शासनाच्या विविध विभागाद्वारे अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून ग्राम परिवर्तन घडविण्यासाठी सर्व विभागांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील निवड झालेल्या गावांच्या विकास कामाबाबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकरी जगदिश मिणीयार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, निवासी उप जिल्हाधिकारी खुदाबक्श तडवी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी रणवीरकर यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. जयवंशी पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात मूलभूत सोयी सुविधांच्या उपलब्धतेसह आर्थिक, सामाजिक शाश्वत विकास साध्य करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत गावांमध्ये शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावांचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट या अभियानाद्वारे साध्य करावयाचे आहे. 
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील निवड झालेल्या गोंडाळा, जामदया, लिंगदरी आणि खिल्लार या गावात कृषि विभागाने शेतकरी गट स्थापन करुन त्यांचे उत्पादन कंपन्यांमध्ये रुपांतर करण्याच्या दृष्टीने आणि बाजाराभिमुख उत्पादन घेण्यासाठी या शेतकऱ्यांच्या कंपन्यांना उपयुक्त व सक्षम करण्याच्या दृष्टीने काम करावे.तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कृषि संबंधीत योजनाचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा. शेतकऱ्यांच्या अर्थिक उन्नतीसाठी रेशीम उद्योग हा उपयोगी ठरु शकतो, याकरीता या गावात रेशीम उद्योगाशी संबंधीत योजनाचा लाभ द्यावा. सदर गावातील शाळेत वीज जोडणी, स्वच्छता गृह, आदीची सुविधा नसल्यास सदर सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच सदर गावांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे का ? याची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी ग्राम भेटीद्वारे या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणुन घेत त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ही जिल्हाधिकारी जयवंशी यावेळी म्हणाले.
या अभियानांतर्गत ग्राम विकास, सहकारी, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक तसेच सर्व संबंधीत विभागांच्या विभाग प्रमुखानी समन्वय ठेवून काम करावे. तसेच या गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये ग्राम विकास सहकाऱ्यांची भूमिका महत्वाची असून, त्यांनी या गावातील सर्वांगिण विकास करण्यासाठी प्रयत्न करा,वा असे ही जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले.
यावेळी बैठकीस सर्व विभागाचे विभाग प्रमुख, संबंधीत गावचे सरपंच, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती. 
****
    

त्रैमासिक विवरणपत्रे ऑनलाईन भरुन सादर करण्याचे आवाहन




त्रैमासिक विवरणपत्रे ऑनलाईन भरुन सादर करण्याचे आवाहन

        हिंगोली,दि.08: माहे जानेवारी 2019 या महिन्याच्या मासिक वेतन देयके दाखल करताना सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांचेकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहितीचे माहे डिसेंबर-2018 अखेरचे ई आर 1 त्रैमासिक विवरणपत्र माहे 30 जानेवारी, 2019 पर्यंत भरावयाचे आहे.
            तसेच या कार्यालयाचे संकेतस्थळ www.mahaswayam.in  वरुन ऑनलाईन ई आर 1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडल्याशिवाय मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके स्विकारले जाणार नाहीत. सर्व कार्यालयांना या कार्यालयामार्फत युजर आय.डी. व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. तसेच सर्व  कार्यालयांनी आपले ई-मेल आयडी, फोन नंबर, पत्ता, टॅन नंबर, पॅन नंबर टाकून आपले प्रोफाईल अपडेट करावी, असे सहायक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, हिंगोली यांनी कळविले आहे .

****




07 January, 2019

जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू


जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू

        हिंगोली,दि.7: जिल्ह्यात  दिनांक 30 डिसेंबर, 2018 ते 6 जानेवारी, 2019 पर्यंत सेनगाव तालुक्यातील मौ. कापडसिंगी येथे श्री संत समर्थ रेखे बाबा यांची यात्रा निमित्त तसेच सापटगाव व कोळसा येथे दिनांक 4 ते 30 जानेवारी, 2019 पर्यंत श्री. खंडोबा यात्रा आणि दिनांक 2 ते 12 जानेवारी, 2019 पर्यंत कुरुंदा हद्दीतील  शिरळी येथे श्री संत रामभाऊ महाराज यांची पुण्यतिथी निमित्त यात्रा आहे. तसेच दिनांक 15 जानेवारी, 2019 रोजी मकरसंक्रांत हा सण साजरा होणार आहे.
            तसेच विविध  संघटनेतर्फे त्याचे मागणी संबंधाने मोर्चे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे सुरु असून अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न निर्माण  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 4 जानेवारी, 2019 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 18 जानेवारी, 2019 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****


शासकीय-निम शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन


शासकीय-निम शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना
 दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन

        हिंगोली, दि.7: रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, यामध्ये दुचाकी चालकाचे होणारे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे.अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीकोणातून त्यांचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देश पातळीवर रस्ता सुरक्षा समिती, राज्य पातळीवर राज्य सुरक्षा समिती व जिल्हास्तरावर जिल्हा सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.
            हिंगोली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये आपघातांचा आढावा घेतला असता दुचाकी वाहनाचे अपघाताचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. त्यावरुन रस्त्यावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टीकोणातून दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे गरजेच आहे. जेणे करुन दुचाकीच्या अपघातांमध्ये डोक्यावर पडून होणाऱ्या मृत्युचे  प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीकोणातून हेल्मेट वापरणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. सर्वसामान्य वाहनचालकांसाठी हेल्मेटची सक्ती करण्या अगोदर मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 129 व महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नियम 250 च्या तरतुदी नुसार शासकीय / निम शासकीय कार्यालयातील जे अधिकारी/कर्मचारी दुचाकीचा वापर करतात त्यांना 15 जानेवारी, 2019 पासून हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे असे समितीमध्ये ठरवण्यात आले आहे.
            जिल्ह्यातील सर्व शासकीय/निम शासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व अधिकारी/कर्मचारी यांना हेल्मेट वापराबाबत सूचना द्याव्यात. जे शासकीय अधिकारी/कर्मचारी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यातंर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असे आवाहन अध्यक्ष जिल्हा सुरक्षा समिती, हिंगोली यांनी केले आहे.

****

मुद्रा बँक योजना जनजागृती महिला मेळावा संपन्न






मुद्रा बँक योजना जनजागृती महिला मेळावा संपन्न

हिंगोली,दि.7: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मुद्रा बँक योजननेची माहिती महिला बचत गटांना व्हावी या उद्देशाने कळमनुरी येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महिलांना मुद्रा बँक योजनेची सविस्तर माहिती देवून, या योजनेचा कसा लाभ घेता येईल याबाबतचे  मार्गदर्शन करण्यात आले.
 यावेळी मेळाव्यास जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, प्रा. केशव पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक विलास जगताप यांच्यासह महिला आर्थिक विकास महामंडळाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.
****


06 January, 2019

पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन




पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

हिंगोली,दि.6: ‘दर्पण’ या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर यांची  जयंती  ‘पत्रकार दिन’ म्हणुन साजरी केली जाते. यानिमित्त येथील जिल्हा माहिती कार्यालयात आज बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, जिल्हा पत्रकार संघचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णिवाल, श्रीमती शांताबाई मोरे, डॉ. प्रल्हाद शिंदे, नजीर अहमद, एहसान खान पठाण, कल्याण देशमुख, केशव जोशी, सुभाष अपुर्वा, मिलींद वानखेडे, प्रकाश इंगोले, प्रा. उत्तम बलखंडे, सुधाकर वाढवे, हाफीज बागवान, बालाजी पाठक, आदी पत्रकार बांधवांची उपस्थिती होती
****