22 August, 2019

गोरखनाथ मंदिर वाई येथील पोळा सणानिमित्त वाहतूकीत बदल


गोरखनाथ मंदिर वाई येथील पोळा सणानिमित्त वाहतूकीत बदल

          हिंगोली,दि.22: प्रतिवर्षी प्रथे व परंपरेप्रमाणे 30 ऑगस्ट 2019 रोजी  पोळा हा सण साजरा करण्यात येणार असून दि. 31 ऑगस्ट रोजी कर सण साजरा करण्यात येणार आहे. कर सणानिमित्ताने पो. स्टे. कुरुंदा हद्दीतील मौजे वाई येथील गोरखनाथ मंदिरास हिंगोली, लातूर, परभणी व नांदेड जिल्ह्यातील जवळपास 50 ते 60 हजार बैलजोड्या दर्शनास व प्रदक्षिणा मारण्या करीता  त्याचे मालक घेऊन येतात त्यामुळे  वसमत औंढा रोडवर बैलांची व बैल फिरविण्यासाठी आणणाऱ्या लेाकांची बरीच गर्दी होते. व सदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्याने सदर रोडवर वाहतुक मोठ्या प्रमाणावर चालू असते व सदर दिवशी वाहतुक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण होण्याची शक्यता असल्याने वसमत टि पॉईंट ते नागेशवाडी पर्यंत रहदारीचा रस्ता हा दिनांक 31 ऑगस्ट 2019 चे 00.00 ते दिनांक 31 ऑगस्ट 2019 रोजीचे 24.00 वाजेपावेतो बंद करण्यात येऊन नांदेडकडून येणारी वाहतुक वसमत मार्गे झिरो फाटा ते हट्टा  जवळा बाजार मार्गे नागेशवाडी असे पर्यायी मार्गाने औरंगाबादकडे व औरंगाबादकडून नांदेडकडे जाणारी वाहतुक ही नागेशवाडी मार्गे जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यास विनंती केली आहे.
                पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या अहवालानुसार सदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्याने रोडवर वाहतुक मोठ्या  प्रमाणावर चालू असते व सदर दिवशी  वाहतुक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने रस्ता वळविणे आवश्यक आहे.
                त्याकरीता वसमत टी पॉईंट ते नागेशवाडी पर्यंत रहदारीचा रस्ता हा दिनांक 31 ऑगस्ट 2019 चे 00.00 ते दि. 31 ऑगस्ट 2019 रोजीचे 24.00 वाजेपावेतो बंद करण्यात येत असून, नांदेडकडून येणारी वाहतुक वसमत मार्गे झिरो फाटा ते हट्टा- जवळा बाजार मार्गे नागेशवाडी अशा पर्यायी मार्गाने औरंगाबादकडे व औरंगाबादकडून नांदेड जाणारी वाहने नागेशवाडी, मार्गे  जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी एका  प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****

प्रधानमंत्री मानधन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पेन्श्न · 23, 24 आणि 25 ऑगस्ट रोजी सजा निहाय ‍‍मेळाव्याचे आयोजन



प्रधानमंत्री मानधन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पेन्श्न
·   23, 24 आणि 25 ऑगस्ट रोजी सजा निहाय ‍‍मेळाव्याचे आयोजन

हिंगोली,दि.22: केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये 18 ते 40 वयोगटातील 2 हेक्टरपर्यंत शेती असलेले सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे. या योजनेत भाग घेणार्‍या शेतकर्‍यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3,000 रुपयांची मानधन (पेन्शन) मिळणार आहे. यात लाभधारक शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला सुद्धा निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. या योजनेत दि. 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत शेतकर्‍यांना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी आपले सरकार सेवा केंद्र/सामायिक सुविधा केंद्र यांच्याकडे स्वतःचा 7/12 चा उतारा, 8 अ, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाइल क्रमांक माहितीची कागदपत्र घेऊन संपर्क साधावा.
या योजनेत भाग घेण्यासाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन योजना व यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनातंर्गत लाभ घेणारे शेतकरी अपात्र असतील. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना याचबरोबर उच्च आर्थिक स्थितीतील शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र नाही. 
केंद्र शासन लाभार्थी हप्त्या इतकीच रक्कम हप्ता म्हणून जमा करणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभार्थी त्यांना मिळणार्‍या आर्थिक साहाय्यातून वरील मानधन योजनेतील लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी बँकेचे अर्ज् भरून देत या योजनेत सहभागी होऊ शकतील. लाभार्थी शेतकर्‍यास पेन्शन कार्ड देखील मिळणार असून अधिक महितीसाठी शेतकर्‍यांनी आपल्या संबंधित तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पात्र शेतकऱ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी जिल्ह्यात दि. 23, 24 आणि 25 ऑगस्ट रोजी सज्जानिहाय (तलाठी कार्यालय) ‍‍मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना वृद्धापकाळात त्यांचे आणि कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असल्याने अधिकाधिक शेतकर्‍यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****


20 August, 2019

शासकीय तंत्रनिकेतन येथे सदभावना दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली



शासकीय तंत्रनिकेतन येथे सदभावना दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली

हिंगोली, दि.20 : भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिवस म्हणून पाळण्यात येतो. येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे सदभावना दिवसानिमित्त प्राचार्य डॉ. पाटील यांनी उपस्थितांना सामुहिकपणे सदभावना दिवसाची प्रतिज्ञा दिली.
यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. आर.के. पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद तसेच जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी हे उपस्थित होते.
0000

रेशीम कृषी प्रदर्शनी मध्ये स्टॉल लावण्याची सुवर्णसंधी


रेशीम कृषी प्रदर्शनी मध्ये स्टॉल लावण्याची सुवर्णसंधी
हिंगोली, दि.20 : रेशीम संचालनालय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे मार्फत रेशीम दिन 2019 साजरा करण्याचे योजिले आहे.सदर कार्यक्रम दिनांक 01 सप्टेंबर ,2019 रोजी  जालना येथे आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे स्थळी रेशीम संचालनालय, म.रा. यांचे  तर्फे  दिनांक 30 ऑगस्ट ते 01 सष्टेंबर रोजी  रेशीम कृषी  प्रदर्शनी आयोतिज करण्यात आली आहे.
सदर प्रदर्शनी भव्य स्वरुपाची असुन संपुर्ण राज्यातुन रेशीम शेतकरी तसेच रेशीम व कृषी विषयाशी संबधित तज्ञ मोठया संख्येने हजर राहणार आहेत. सदर प्रदर्शनी मध्ये आपल्या उत्पादनाची जाहिरात व विक्री करणे करिता स्टॉल लावण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन देत आहे, जर आपण रेशीम साहित्य निर्मीती करणारे, कृषी कंपन्या, विमा कंपन्या, खाद्य पदार्थ विक्री करणारे, रेशीम व कृषीसाठी उपयुक्त साहित्य निर्मीती करणारे उत्पादक व विविध बचत गट इत्यादी आहात तर आपन आपल्या उत्पादनाची मोठया प्रमाणात जाहिरात व विक्री करणे करिता प्रदर्शनी  स्थळी  स्टॉल लावावे. स्टॉलचे आरक्षण  प्रथम आगमन - प्रथम प्राधान्य  स्तरावर करण्यात येणार आहे. इच्छुक व्यक्ती / कंपनी / बचत गट / संस्था / शासकीय- निम-शासकीय कार्यालये / विद्यापीठ / कृषी विज्ञान केंद्र / शासकीय संस्था यांनी  दिनांक 26 ऑगस्ट, 2019 पर्यंत आपली नोंदणी करावी.  स्टॉल नोंदणी  तसेच अधिक माहिती संपर्कासाठी रेशीम संचालनालय,महाराष्ट्र राज्य,6 वा माळा,नवीन प्रशासकीय ईमारत क्रं.2,विभागीय आयुक्त कार्यालय परिसर,सिव्हील लाईन्स,नागपुर-440001 फोन नं.0712-2569924 / 2569926 ई.मेल-dos.maha@gmail.com, सहाय्यक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय,प्लॉट क्रं.54, सदाशिव नगर, धुत हॉस्पिटल समोर,सिडको एन-2,औरंगाबाद.- 4031003 फोन नं.0240-2475747 मो.क्र.9420191067 ई.मेल-adsilkaurangabad@gmail.com, रेशीम विकास अधिकारी श्रेणी-2 , जिल्हा रेशीम कार्यालय,कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर,कापुस प्रयोगशाळा इमारत, जालना.-431203 फोन नं.02482-229047 मो.क्र.9850447096 ईमेल-reshimjalna@gmail.com येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

****

शास्त्रीय व लोककला क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना नोंदणीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ


शास्त्रीय व लोककला क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना
नोंदणीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
        हिंगोली, दि.20: शास्त्रीय व लोककला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दिनांक 24 नोव्हेंबर, 2017 च्या शासन निर्णयानुसार 10 वी च्या परीक्षेत शालेय विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरीता शास्त्रीय व लोककला क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची नोंदणी करणे कामी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर अर्ज संचालनालयाच्या पुणे विभागीय कार्यालयाकडे सादर करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑगस्ट, 2019 होती.
            परंतू मागील आठ दिवसांपासून राज्याच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टी निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती विचारात घेता विशेष बाब म्हणून सदरचे अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत वाढविण्यात येत आहे.
****

19 August, 2019

शासकीय तंत्रनिकेतन येथे अतिरिक्त प्रवेश फेरी


शासकीय तंत्रनिकेतन येथे अतिरिक्त प्रवेश फेरी  

        हिंगोली, दि.19: येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमास प्रवेश इच्छुक दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांकरिता संस्थास्तरावर अतिरिक्त समुपदेशन  प्रवेशफेरी दिनांक 23 ऑगस्ट 2019 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी दिनांक 23 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 10.00 वाजता संस्थेत  आवश्यक त्या सर्व मूळ कागदपत्रे, कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी व विहित  प्रवेश शुल्कासह उपस्थित राहून या प्रवेश फेरीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. के. पाटील यांनी केले आहे.

****


15 August, 2019



शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा
                              - पालकमंत्री अतुल सावे
हिंगोली, दि. 15 : प्रत्येक सामान्य नागरिकांना स्वत:च्या मालकीची घरे मिळावी हिच शासनाची इच्छा असून  ग्रामीण नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री अतुल सावे  यांनी केले.
मौजे लिंगदरी ता. सेनगांव येथे आयोजित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत घरकूल लोकार्पन व भूमीपूजन सोहळा कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे  बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. पी. घुले, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल) श्री. गणेश वाघ,  तहसिलदार जिवककुमार कांबळे, लिंगदरी गावचे सरपंच विठ्ठल राठोड,  यांच्यासह  अधिकारी व पदाधिकारी, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विकासापासून वंचित राहिलेली सुमारे 1 हजार गावे दत्तक घेतली असून त्यातील  हे मौजे लिंगदरी गाव असून एकूण एकशे अकरा घरकुल मंजुर असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. येथील नागरिकांप्रमाणेच राज्यातील प्रत्येक विकासापासून वंचित असलेल्या गावातील ग्रामस्थांना सुख सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाने सुरु केलेल्या आयुष्यमान भारत योजनेमध्ये सामान्य नागरिकांना सुमारे 5 लाख रुपयांचा विमा मोफत मिळणार असून या योजनेतंर्गत सुमारे 10 कोटी कुटुंबांना आरोग्याच्या मोफत सुविधा देण्यात येणार असल्याचेही यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. तसेच उज्वला गॅस योजना, मुद्रा लोन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, अशा अनेक शासनाच्या कल्याणकारी योजना असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्री यांनी केले.   
         कार्यक्रमाचे प्रास्ताविकात लिंगदरी गावचे उपसरपंच सुमित राठोड यांनी लिंगदरी गाव विकासाकडे वाटचाल करत असून या गावाने शासनाच्या जलयुक्त शिवार योजना, नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, मनरेगा योजना आदी शासनाच्या योजनांचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.  
            प्रारंभी पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते लाभ मिळालेल्या गावातील ग्रामस्थांना प्रातिनिधीक स्वरुपात शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले तसेच  महिला बचत गटांना फिरता निधी मंजुर प्रमाणपत्र,  शेतकरी गटांचे नोंदणी प्रमाणपत्र , जिल्हा उद्योग केंद्राअंतर्गत व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र व महाराष्ट्र हरित सेना सदस्य प्रमाणपत्र आदि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शेवटी आभार मुख्याध्यापक श्री. मुळे यांनी मानले.
*****