11 January, 2021

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील अडचणी सोडविण्यसाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन

 

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील अडचणी सोडविण्यसाठी

आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन

 

            हिंगोली,दि.11(जिमाका): राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना येणाऱ्या अडचणीच्या निराकरणासाठी दि. 13 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथील जिल्हा नियोजन सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी 13 जानेवारी जिल्हा नियोजन सभागृहात दुपारी 12.00 वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

****

सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

·   सन 2019-20 साठी शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क योजनेतंर्गत रिअपील करणे

 

हिंगोली,दि.11(जिमाका): सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासुन शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडिबीटी (mahadbt) पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे. त्यावर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता सामजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती /फ्रिशिप योजनांकरीता ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत केले जात आहेत.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासनमान्य मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनु.जाती, विमुक्त्जाती भटक्या, इतर प्रर्वगातील विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसायीक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजुर करणे या योजनेतंर्गत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी रि-अपील करण्यासाठी सन 2020-21 या करीता नवीन अर्ज करण्यासाठी महाडिबीटी हे पोर्टल दि.03 डिसेंबर, 2020 पासून सुरू करण्यात आले आहे.

या योजनेकरीता अर्ज करण्याची अंतिम दि . 31 जानेवारी, 2021 असून जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विहित मुदतीमध्ये आपले शिष्यवृत्तीचे अर्ज संकेतस्थळावरतीभरुन ते ऑनलाईन पध्दतीने आपल्या महाविद्यालयाकडे फॉरवर्ड करावेत. तसेच महाविद्यालयांनी सदरचे अर्ज छाननी करुन शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचेंच अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत.   

 महाडीबीटी पोर्टलवर नोंदणीकृत होत असलेले अर्ज हे महाविद्यालयाद्वारे या कार्यालयास प्राप्त होतात. परंतु या पैकी नॅान आधार असलेले अर्ज हे देयक बनविण्यासाठी पात्र होत नाहीत. यात नोंदणीकृत अर्ज NOT ALLOTED होण्याचे प्रमुख कारण हे नॉन आधार अर्ज असे आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील अर्जांची ऑनलाईन तपासणी करतांना सर्व महाविद्यालयानी भरलेल्या अर्जाचा प्रोफाईल प्रकार आधार बेस आहे की नाही याची खात्री करुनच फारवर्ड करावा. तसेच नॉन आधार अर्जाबाबत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या बाबत अवगत करावे.

 तसेच ज्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नॉन आधार अर्ज भरले आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्राफाईलमधील आधार क्रमांक अद्यावत करावा. तसेच आधार संलग्नीकृत बँक खाते आहे की नाही याची खातरजमा या https://residen.uidai.gov.in/bank-mapper या लिंकद्वारे करुन घ्यावी. अशा सूचना आपल्या स्तरावरुन विद्यार्थ्यांना देण्यात यावी, असे  आवाहन  समाज  कल्याण सहाय्यक  आयुक्त शिवानंद मिनगीरे केले आहे.

****

           

 

 

 

08 January, 2021

पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत बदल

 


 हिंगोली, दि.8 (जिमाका):  पशुसंवर्धन विभागांतर्गत कार्यरत असलेले राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने हे विभागाच्या दि. 20 जून, 1996 च्या परिपत्रकात दिलेल्या वेळांप्रमाणे दररोज दोन सत्रात चालु असतात. पशुपालकांच्या दृष्टीने या वेळा अत्यंत गैरसोयीच्या ठरत असल्याने त्यामध्ये सुधारणा करणेबाबत अनेक संघटना  तसेच विविध ग्रामपंचायती यांच्याकडून निवेदने, विनंती अर्ज  वारंवार प्राप्त होत होते. त्याद्वारे पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा सलग असाव्यात अशी मागणी होत होती. त्याअनुषंगाने खात्याच्या अधिपत्याखालील विभाग/कार्यालये तसेच राज्यातील जिल्हा परिषदांकडून सदर बाबतीत अभिप्राय मागवून शासनास सुधारीत वेळा मान्यतेस्तव प्रस्तावीत करण्यात आल्या होत्या.

त्यानुसार दि. 04 जानेवारी, 2021 च्या शासन पत्रान्वये मान्यता घेवून पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा सुधारीत करण्यात आल्या आहेत. कामकाजाच्या वेळा संबंधीचे या पुर्वीचे सर्व आदेश / परिपत्रके रद्द करण्यात आली असून  सुधारीत कामकाजाच्या वेळा खालील प्रमाणे कटाक्षाणे आमलात याव्यात. त्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये असे पशुसंवंर्धन आयुक्त पुणे यांनी कळविले आहे.

सुधारीत वेळेतील बदल पुढिल प्रमाणे असा आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते दुपारी 04.30 वाजेपर्यंत राहील. यामध्ये जेवणाची सुट्टी दुपारी 01.00 ते 01.30 अशी असेल. तर शानिवार रोजी सकाळी 08.00 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत वेळ असेल. सदर वेळ ही पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1/श्रेणी-2, ता.ल.प.स.व.चि. (सर्व), जि.प.स.चि. (सर्व), फिरता पशुवैद्यकीय दवाखाने यांना लागू राहील. तसेच पशुपालकांना आकस्मिक प्रसंगी 24 तास सदैव सेवा उपलब्ध राहणार आहे.  तर कार्यालयात काम करणा-या चतुश्रेणी कर्माचा-यांना सेवा सकाळी कामाच्या वेळेपुर्वी अर्धातास अगोदर व संध्याकाळी अर्धा तास उशिरा जादा राहतील, असेही पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये  कळविले आहे.

*****

 

 

कृषी विज्ञान केंद्र, तोंडापुर येथे शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन व मधुमक्षिका पालन अभ्यासक्रम सुरु

 

कृषी विज्ञान केंद्र, तोंडापुर येथे शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन व

मधुमक्षिका पालन अभ्यासक्रम सुरु

 

हिंगोली, दि.8 (जिमाका) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारे मुक्त कृषी शिक्षण केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापुर येथे शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन व मधुमक्षिका पालन अभ्यासक्रम सुरु...

       यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारे मुक्त कृषी शिक्षण केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापुर येथे शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी Online पध्दतीने प्रवेश अर्ज स्वीकारणे सुरु झाले असून दि.31 जानेवारी 2021 ही ‍अंतिम तारीख आहे. या अभ्यासक्रमासाठी 10 वी उत्तीर्ण  वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या कोणालाही हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. हा अभ्यासक्रम 6 महिने कालावधीचा असून दर आठवडयाला Online पध्दतीने वर्ग घेतल्या जातील, परीक्षा मात्र  Offline पध्दतीची राहील.

       तसेच मधुमक्षिका पालन अभ्यासक्रम सुध्दा सुरु करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी सुध्दा Online पध्दतीने प्रवेश अर्ज स्वीकारणे सुरु झाले असून दि. 31 जानेवारी 2021 ही ‍अंतिम तारीख आहे. या अभ्यासक्रमासाठी सुध्दा 10 वी उत्तीर्ण  वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या कोणालाही हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. हा अभ्यासक्रम सुध्दा 6 महिने कालावधीचा असून दर आठवडयाला Online पध्दतीने वर्ग घेतल्या जातील, परीक्षा मात्र  Offline पध्दतीचीच राहील.

       या दोन्ही अभ्यासक्रमासाठी हिंगोली जिल्हयातील ग्रामीण तरुणांनी मोठया प्रमाणात भाग घ्यावा असे आवाहन मुक्त कृषी शिक्षण केंद्राचे केंद्र प्रमुख डॉ.पी.पी.शेळके व केंद्र संयोजक प्रा.अनिल ओळंबे यांनी केले आहे .

 

00000

कोविड लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीरित्या पूर्ण

 



कोविड लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीरित्या पूर्ण

हिंगोली, दि.8 (जिमाका) : आज जिल्हा रुग्णालय येथे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीची रंगीत तालिम (ड्रायरन) ची प्रक्रीया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी याच्या  नियंत्रणात अप्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम पोलीस विभागाचे प्रतिनिधी यांनी प्रथम लस घेणाऱ्या सर्व लाभार्थीची सॉफ्टवेअर नोंदणी प्रमाणे पॅन कार्ड पडताळणी करण्यात येऊन नोंदणीप्रमाणे पॅनकार्ड खात्री झाल्यानंतर संबंधिताना कोविन ॲपमध्ये लाभार्थींची नोंदणी करण्यात आली. आजच्या ड्रायरन  मध्ये एकूण 25 लाभार्थी यांना लस देण्यात आली. यांनंरतचे लसीकरण सत्र हे शासनाचे आदेशानुसार वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शक सुचनेनुसार राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी यावेळी सांगितले. लस देण्यात आलेल्या लाभार्थींना डॉक्टरांच्या निगराणीखाली अर्धातास ठेवण्यात आले. दरम्यान यांच पल्स ऑक्सीन ,बी.पी., शुगर ई. चाचण्या करण्यात येऊन स्थिती ठिक असल्यास खात्री करुन कोणताही त्रास नसल्याची खात्री करण्यात आली.

 तसेच लसीकरणाच्या लाभ घेतलेल्या व्यक्तींना त्यांच्या वैयक्तीक मोबाईल नंबर वरती त्यांचे लसीकरण यशस्वीरित्या झाल्याचा संदेश कोविन ॲपद्वारे पाठविण्यात आले .

याप्रासंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. मंगेश टेहरे , डॉ. रविंद्र जायभाये आदी उपस्थित होते. कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालीमच्या यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग यांनी प्रयत्न केले.

तसेच उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी आणि प्राथमिक आरोगय केंद्र डोंगरकडा येथेही कोविड कोविड लसीकरणाची रंगीत तालीम  यशस्वीरित्या पूर्ण कण्यात  आली .

0000

 

 

 

 

कोरोना लसीकरणांचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी




 कोरोना लसीकरणांचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे

                                         जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

             हिंगोली, दि.8 (जिमाका): कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला कोरोनाला पूर्णत: प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाकडून कोरोनाची लस आणि लसीकरण करण्याचे आदेश कधीही प्राप्त होऊ शकतात. याकरीता आरोग्य यंत्रणेने लसीकरणाबाबतचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोव्हिड-19 लसीकरण अंतर्गत जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गित्ते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम आणि प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी  डॉ.  देवेंद्र जायभाये यांची प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, शासनाकडुन कधीही कोरोनाची लस प्राप्त होऊ शकते. त्यानुसार आरोग्य यंत्रणेने लसीकरणाबाबतचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे. सदर लसीकरण शासनाच्या निर्देशानुसार प्राधान्याने आरोग्य संबंधित कार्यरत कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत कोरोना लसीकरण हा अत्यंत महत्वाचा विषय असल्याने आरोग्य व संबंधित यंत्रणांनी याकडे काळजीपूर्वक, भान ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे. आपल्या जिल्ह्याची अंदाजे 14 लाख 50 हजार लसींची साठवणूक करण्याची क्षमता आरोग्य विभागाकडे आहे. तसेच कोरोना लस साठवणूकीबरोबरच लसीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यातील 24 प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाचे नियोजन करुन आपली यंत्रणा सज्ज ठेवावी. लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे.

            जिल्हास्तरावरुन आरोग्य संस्थेचे आणि लसीकरण पथकाचे यूजर आयडी तयार करण्याचे काम वेळेत पुर्ण करावे. कोरोना लस घेणाऱ्यांची निवड करून त्यांचे ‘कोविन अॅप’ मध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपिंग करण्याचे काम देखील वेळेत पुर्ण करावे. लसीकरण करण्यात येणाऱ्या व्यक्तींना मॅसेज् द्वारे वेळ कळविण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रात गर्दी होवून नये, तसेच लसीकरण झालेला व्यक्ती दूसऱ्याच्या संपर्कात येवू नये यासाठी योग्य नियोजन करावे. ठरविण्यात आलेल्या प्रक्रियेनुसारच लसीकरणाची कार्यवाही करावी. लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी येण्या-जाण्याचा मार्ग वेगवेगळा करावा. लसीकरण झाल्यानंतर संबंधीत व्यक्तींना निरिक्षण कक्षात निरिक्षणाखाली ठेवण्यासाठी निरिक्षण कक्षात योग्य नियोजन करावे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी यांनी  समन्वयाने लसीकरणाचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे.

            ग्रामीण भागात 24 प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी 2 लसीकरण केंद्र असे यामध्ये 48 लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रत्येक सत्रात 100 जण असे एकुण 4 हजार 800 जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. तर शहरी भागात हिंगोली-4, वसमत-4, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव प्रत्येकी 2 असे एकुण 14 केंद्रावर 1 हजार 400 जणांना लसीकरण करण्यात येणार आहे.

            लसीकरणांची पूर्वतयारी म्हणुन आरोग्य विभागाच्या वतीने आज जिल्ह्यात 3 ठिकाणी कोरोना लसीकरणाबाबतची यशस्वी रंगीत तालीम घेण्यात  आल्याची माहिती ही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यावेळी दिली

            मागील काही दिवसापासुन कोरोना रुग्णात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात परदेशातून तसेच बाहेरील शहरातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवुन त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करावे, असे निर्देश ही जिल्हाधिकारी जयवंशी यांनी यावेळी दिले.

            यावेळी बैठकीस गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

****

06 January, 2021

पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 



 

हिंगोली,दि.6: ‘दर्पण’ या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर यांची  जयंती  ‘पत्रकार दिन’ म्हणुन साजरी केली जाते. यानिमित्त येथील जिल्हा माहिती कार्यालयात आज बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, तुकाराम झाडे, श्रीमती शांताबाई मोरे,  सुभाष अपुर्वा, कल्याण देशमुख, उत्तम बलखंडे, बाबाराव ढोकणे, श्याम सोळंके, गोपाल सरानाईक, नंदकिशोर कांबळे, विलास जोशी, रमेश वाबळे अरुण दिपके, सुनिल पाठक, विजय गुंडेकर आदी पत्रकार बांधवांची उपस्थिती होती

****