27 December, 2021

 


जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 :  डॉ.भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा गौण खनिज अधिकारी रविंद्र मारबते, नायब तहसीलदार डी. एस. जोशी  यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

25 December, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 01 रुग्णावर उपचार सुरु

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर आज घडीला 01 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 64 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 667 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 01 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली  यांनी कळविले आहे.

*******

 

बाधित व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात अधिकचे निर्बंध लागू

  • रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत एकत्र येण्यास मज्जाव
  • सर्व प्रकारच्या समारंभात उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 :  कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार जगभर अत्यंत वेगाने होत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत ओमायक्रॉन बाधितांची संख्या 88 असल्याचे आढळले आहे. ओमायक्रॉनची लागण होण्याचे प्रमाण गत आठवड्यात वाढल्याचे दिसून येत आहे. नाताळ, लग्नसराई, इतर सणवार व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे.

त्यामुळे बाधित व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता सद्यस्थितीतील निर्बंधापेक्षा अधिक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने  जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी ओमायक्रॉन व्हेरियंटच्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी खालीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

1. शासनाने नाताळ सण साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या असून त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे सूचनांचे पालन करण्यात यावे.

2. विवाह समारंभासाठी बंदिस्त सभागृहामध्ये उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त 100 च्या मर्यादेत असेल. असे समारंभ मोकळ्या जागेमध्ये आयोजित करताना जास्तीत जास्त 250 व त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे.

3. अन्य सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये जेथे लोकांची सतत उपस्थिती राहील असे कार्यक्रम बंद जागेमध्ये आयोजित करतेवेळी जास्तीत जास्त 100 उपस्थितांची मर्यादा पाळावी. असे समारंभ मोकळ्या जागेमध्ये आयोजित करताना जास्तीत जास्त 250 व त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे.

4. वर नमूद केलेल्या कार्यक्रमा व्यतिरिक्त इतर कार्यक्रमाचे आयोजन बंद जागेमध्ये करीत असताना आसन व्यवस्था फिक्स असलेल्या ठिकाणी त्या जागेच्या 50 टक्के क्षमतेच्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. तसेच बंद जागेमध्ये परंतु आसन व्यवस्था फिक्स नसलेल्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करीत असताना व आसन व्यवस्था त्या जागेच्या 25 टक्के क्षमते इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. असे कार्यक्रम मोकळ्या जागेमध्ये आयोजित करताना त्या जागेच्या 25 टक्के पेक्षा अधिक उपस्थिती राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

5. क्रीडा स्पर्धा व सामन्याचे आयोजन करताना प्रेक्षक क्षमतेच्या जास्तीत जास्त 25 टक्के उपस्थितीची मर्यादा पाळण्यात यावी.

6. रेस्टॉरंट, जिम, स्पा, सिनेमा व नाट्यगृहे तेथील आसनक्षमतेच्या 50 टक्के मर्यादेच्या अधीन राहून सुरु ठेवण्यास मुभा राहील. परंतु तेथे एकूण आसनक्षमता व परवानगी देण्यात आलेली 50 टक्के क्षमता याबाबत सूचना फलक दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावा.

7. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना रात्री 9.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मज्जाव राहील.

8. तसेच यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार निर्गमित केलेले कोरोना निर्बंध, मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. 

त्यानुसार वरीलप्रमाणे आदेश निर्गमित करीत असून सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येऊन संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 यानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प.न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल.

*****

24 December, 2021

 जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 01 रुग्णावर उपचार सुरु

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर आज घडीला 01 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 64 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 667 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 01 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली  यांनी कळविले आहे.

*******

 


जिल्ह्यातील बालविवाह समूळ नष्ट करण्यासाठी

बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावेत

-- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 24 :  जिल्ह्यातील बालविवाह समूळ नष्ट करण्यासाठी बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी विशेष लक्ष द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा बाल संरक्षण कक्षाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलतांना श्री. पापळकर म्हणाले, बालविवाह समूळ नष्ट करण्यासाठी तालुका बाल संरक्षण समिती संदर्भातील सुचना फलक प्रत्येक तहसील कार्यालयात लावावेत. तसेच प्रत्येक ग्राम पंचायत कार्यालयात ग्राम बाल संरक्षण समितीचे सूचना फलक लावावेत, अशा सूचना दिल्या. तसेच  कोविड आजाराने मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सहाय्य मिळण्यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या http://mahacovid19relief  या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी üकेले .

 या बैठकीमध्ये समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी कक्षाने राबविलेले विविध जनजागृती कार्यक्रम, जिल्ह्यात ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य व सदस्य सचिवांना दिलेले प्रशिक्षण तसेच कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटी तसेच जिल्ह्यातील बालगृह आणि त्यातील बालकांची कोविड काळात घेतली जात असलेली काळजी या विषयाची माहिती दिली.

             या बैठकीस पोलीस अधीक्षक यांचे Óप्रतिनिधी, विशेष बाल पोलीस पथक अधिकारी, जिल्हा आरोग्यê अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, üüबाल न्याय मंडळ üसदस्य, बाल कल्याण समिती सदस्य, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड.अनुराधा पंडीत, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ती úरेशमा पठाण, चाईल्ड लाईनÔमेंबर विकास लोनकर आदी उपस्थित होते.ê

*****

23 December, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 01 रुग्णावर उपचार सुरु

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर आज घडीला 01 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 64 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 667 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 01 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली  यांनी कळविले आहे.

*******




 कोविड लसीकरण व पाणी वाचवा या विषयावर पथनाट्याद्वारे जनजागृती

           

हिंगोली (जिमाका), दि. 23 : - नेहरु युवा केंद्र तथा युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकारच्या वतीने जिल्ह्यातील अनेक खेड्यात ठिकठिकाणी जाऊन पथनाट्याद्वारे लोकांना लसीकरण करुन घेण्यासाठी व लसीकरण केल्यास आपण कसे सुरक्षित राहू शकतो, तसेच आपल्या देशाला कोरोनाच्या महामारीतून बाहेर कसे काढावे आणि प्रत्येकाला लसीकरण घेणे जरुरी आहे यासह आता पण कोरोनाचा धोका टळला नाही म्हणून घरातून बाहेर निघताना मास्क लावणे, दोन व्यक्तीमधील अंतर बाळगणे, सॅनिटायझरचा वापर करणे या विषयावर जनजागृती करण्यात आली .

तसेच पाणी वाचवा या विषयावर पाणी म्हणजे जीवन आहे. पाणी कसे वापरले पाहिजे, पाण्याची बचत कशी केली पाहिजे या विषयी व पाणी अडवा, पाणी जिरवा, मागेल त्याला शेततळे अशा विविध विषयावर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली .   

ही मोहिम जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी नेहरु युवा क्रीडा मंडळ खरबी, पंचशील बहुउद्देशीय सांस्कृतिक कला मंडळ, नेहरु युवा केंद्र तालुका समन्वयक नामदेव फरकंडे, संदीप शिंदे, सिंधू केंद्रे व गावातील सरपंच, पोलीस पाटील, आशा सेविका, आरोगय सेविका, नागरिक उपस्थित होते.

 

****