06 July, 2022

 

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 202 मिमी पावसाची नोंद

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 06 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 8.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 202.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 23.55  टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज दिनांक 06 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

            हिंगोली 03.70 (250.70) मि.मी., कळमनुरी 9.70 (191.40) मि.मी., वसमत 14.00 (187.60) मि.मी., औंढा नागनाथ 16.60 (194.80) मि.मी, सेनगांव 2.50 (179.60) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 202.40 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

******

05 July, 2022

 

हिंगोली जिल्ह्यासाठी 870 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर

 

 

हिंगोली (जिमाका),  दि. 05 : सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने माहे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर-2022 या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. या तीन महिन्‍याचे जिल्‍ह्यासाठी  870 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकांस संबंधित स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.  

तालुकानिहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे.  हिंगोली-197 क्विंटल, औंढा ना.-86.50 क्विंटल, सेनगाव-191 क्विंटल, कळमनुरी-187 क्विंटल, वसमत-208.50 क्विंटल असे जिल्ह्यासाठी एकूण 870 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर झाले आहे. सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली यांनी  केले आहे.

*****

 

जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना स्थगिती

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 : जिल्हा नियोजन समितीच्या नवीन नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांसह जिल्हा नियोजन समित्यांचेही पुनर्गठन होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2022-23 अंतर्गत दि. 1 एप्रिल, 2022 पासून आजतागायत विविध योजनांतर्गत कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती देण्यात आली आहे. याची सर्व यंत्रणांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा नियोजन विभागाने केले आहे.

*******

 

 

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 193.60 मिमी पावसाची नोंद

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 05 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 21.90 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 193.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 22.52  टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज दिनांक 05 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

            हिंगोली 30.50 (247.00) मि.मी., कळमनुरी 19.00 (181.70) मि.मी., वसमत 18.70 (173.60) मि.मी., औंढा नागनाथ 18.40 (178.20) मि.मी, सेनगांव 20.80 (177.10) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 193.60 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

******

04 July, 2022

 

शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी

मिशन झिरो ड्रॉपआऊट मोहीम यशस्वीपणे राबवावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली (जिमाका), दि. 04 : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी मिशन झिरो ड्रॉपआऊट मोहिम यशस्वीपणे राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

आज येथील जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली मिशन झिरो ड्रॉपआऊट मोहिम राबविण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, स्वयंसेवी संस्थेचे जयाजी पाईकराव यांच्यासह पोलीस विभाग, आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांन शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दि. 5 जुलै ते दि. 20 जुलै, 2022  या कालावधीत मिशन झिरो ड्रॉपआऊट ही मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत. या सर्वेक्षणाच्या कालावधीत शाळाबाह्य बालकांच्या नोंदी घरोघरी, वसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, विटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, बालमजूर तसेच स्थलांतरित कुटुंबांमधून करण्यात याव्यात. तसेच मागास, वंचित गटातील व अल्पसंख्याक वस्तीतील बालकांची माहिती मिशनमध्ये घेण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व खेडी, गांव, वाडी, तांडे, पाडे व शेतमळ्यात वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या शाळाबाह्य बालकांचा सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात यावा. महिला बालविकास अंतर्गत बालगृह, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्था यामधील बालकांचाही या मिशनमध्ये समावेश करण्यात यावा. एकही शाळाबाह्य , स्थलांतरित बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.  

शिक्षणाधिकारी श्री. सोनटक्के यांनी या सर्वेक्षणात दाखलपात्र विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करुन त्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण सुरु ठेवणे व बालकांची गळती शुन्यावर आणणे हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. 6 ते 18 वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण शिक्षकामार्फत करण्यात येणार आहे. तर 3 ते 6 वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण अंगणवाडी पर्यवेक्षकामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी यावेळी दिली.

*****

 

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 171.70 मिमी पावसाची नोंद

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 04 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 26.90 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 171.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 19.97 टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज दिनांक 04 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

            हिंगोली 22.40 (216.50) मि.मी., कळमनुरी 37.50 (162.70) मि.मी., वसमत 32.70 (154.90) मि.मी., औंढा नागनाथ 24.60 (159.80) मि.मी, सेनगांव 16.50 (156.30) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 171.70 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

******

 अन्न व्यवसायिकांनी अन्न आस्थापना स्वच्छ व नीटनेटकी ठेवून व्यवसाय करावा

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 04 : सध्या हिंगोली जिल्ह्यात पावसास सुरुवात झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यामधील सर्व हॉटेल व्यवसायिक, मिठाई  भांडार, चाट भांडार, पाणी पुरी तसेच भेल विक्रेते या व्यवसायिकांची सखोल तपासणी करुन तपासणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या व्यवसायीकाविरूद्ध कडक कारवाही करण्याविषयी  जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी आदेशित  केले आहे.

या आदेशाच्या अनुषंगाने वरील अन्न व्यवसायिकांचे प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी यांच्याकडून सखोल तपासणी होऊन, तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या व्यवसायिकांविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल. तसेच  विनापरवाना, विना नोंदणी व्यवसाय करणाऱ्या आस्थापना विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल.

त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामधील सर्व हॉटेल व्यवसायिक, मिठाई  भांडार, चाट भांडार, पाणी पुरी तसेच भेल विक्रेते अन्न व्यवसायिकांनी अन्न आस्थापना स्वच्छ व नीट नेटकी ठेवावी. तसेच तयार अन्न पदार्थ नीट झाकून ठेऊन व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, हिंगोली कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

*****

वृ