02 September, 2022

 

महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेमध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य नाविण्यपूर्ण स्टार्टअप धोरण-2018 जाहीर केले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविण्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य नाविण्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी सोसायटीमार्फत विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून नवोदित उद्योजकांच्या कल्पनांना पोषक वातावरण पुरवून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या स्टार्टअपची स्वप्ने साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या तळागाळातील नवउद्योजकांना आणि नाविण्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे तसेच राज्यातील परिसंस्था बळकट करणे ही या स्टार्टअप यात्रेची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

या स्टार्टअप यात्रेच्या डिस्प्ले व्हॅनद्वारे हिंगोली जिल्ह्यामध्ये दि. 20 ऑगस्ट ते दि. 2 सप्टेंबर दरम्यान सर्व तालुक्यामध्ये प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. त्याचबरोबर दि. 14 सप्टेंबर, 2022 रोजी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर आणि सहभागी स्टार्टअपचे सादरीकरण सत्र (Boot Camp and Pitching Session) हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयात होणार आहे. या सादरीकरण सत्रामध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय, कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनीबीलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छत ऊर्जा इ.), ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशिलता व इतर विविध क्षेत्रातील नाविण्यपूर्ण कल्पना व उद्योगांचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी दिली जाईल. पहिल्या तीन उत्कृष्ट सादरीकरणास अनुक्रमे 25 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपये असे पारितोषिक देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळणार आहे.

उपरोक्त नाविन्यतापूर्ण कल्पना व उद्योगांचे सादरीकरण करण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांनी आपल्या नाविन्यतापूर्ण कल्पना व उद्योगांबाबतच्या सादरीकरण सत्रामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. या यात्रेमध्ये जास्तीत जास्त नवोदित उद्योजकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. रा.म.कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

*****

 

 

दिपावलीनिमित्त तात्पुरते फटाके परवान्यासाठी अर्ज करावेत

 

            हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्ह्यात दिपावली-2022 संबंधाने तात्पुरते फटाके परवाना (मोकळ्या जागेत) मिळण्यासाठी दिनांक 21 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत किरकोळ फटाके विक्रीचा व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांना तात्पुरते फटाके परवाना मिळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांच्याकडे अर्ज करावेत. हा अर्ज स्फोटक अधिनियम 2008 मधील नियम 113 (फॉर्म नं. एई-5) मध्ये करणे आवश्यक आहे. अर्जासोबत अर्जदाराच्या पासपोर्ट साईज आकाराची तीन फोटो व संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांचे नाहरकत प्रमाणपत्र व अर्जदारांचे चारित्र्य प्रमाणपत्र, जागेच्या मालकीचा पुरावा व मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक राहील. खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून तात्पुरते फटाके परवान्यासाठी दि. 12 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत. त्याशिवाय अर्ज स्विकारले जाणार नाहीत.       

तात्पुरते फटाके ज्वलनशील नसलेल्या शेडमध्ये ठेवण्यात यावे व त्यामध्ये अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था ठेवावी, फटाके  विक्रीचे व साठवणुकीचे दुकाने  एकमेकांपासून  कमीत कमी तीन मीटर अंतरावर असावेत आणि सुरक्षित कामापासून 50 मीटर अंतरावर असावे, फटाके शेड हे एकमेकाच्या समोर नसावे, कोणत्याही प्रकारचे तेलाचे दिवे, गॅस दिवे, उघडे दिवे शेडमध्ये सुरक्षित अंतरामध्ये वापरु नये व विद्युत  बल्ब वापरल्यास ते भिंतीला लावलेले असावेत. केवळ वायरने लोंबकाळत ठेवण्यात येऊ नये. विद्युत  बल्बचे बटन प्रत्येक दुकानाच्या भिंतीवर लावलेले असावेत व मास्टर स्विच प्रत्येक रांगेमध्ये असावे. कोणत्याही प्रकारचे फटाके शेड पासून 50 मीटर आत फोडू नये. एका ठिकाणी 50 पेक्षा अधिक दुकांनाना  परवानगी देण्यात येणार नाही. व्यवसाय कर अधिकारी यांचे ना-देय प्रमाणपत्राशिवाय अर्ज स्विकारला जाणार नाही. तात्पुरता फटाका परवान्याची पाचशे रुपये फीस चलनाद्वारे भरणा करणे आवश्यक राहील, असे जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

****

 

विकास योजनेमध्ये सार्वजनिक सोयी-सुविधांची आरक्षणे प्रस्तावित करण्यासाठी

गुगल फॉर्मवरील प्रश्नावली भरुन देण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : वसमत नगर परिषदेने ठराव क्र.07 दि. 11 फेब्रुवारी, 2021 अन्वये वसमत नगर परिषद हद्दीची विकास योजना, कळमनुरी नगर परिषदेने (मुळ हद्दीची दुसरी सुधारीत व अतिरिक्त क्षेत्राची सुधारीत) विकास योजना आणि नगर पंचायत औंढा नागनाथ ठराव क्र. 02 दि. 03 मार्च, 2021 अन्वये औंढा नगर पंचायत हद्दीची विकास योजना तयार करण्यासाठी  महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम -23 (1) सह कलम-38 अन्वये इरादा जाहीर केला आहे.

विकास योजनेमध्ये आवश्यक सार्वजनिक सोयी-सुविधांची आरक्षणे प्रस्तावित करण्यासाठी शहरातील स्थानिक जनतेचा सहभाग असणे आवश्यक आहे. जेणेकरुन जनतेच्या विकास योजनेबाबतच्या अपेक्षा व शहराची खरीखुरी निकड याबाबतची माहिती संकलित करणे यामुळे शक्य होईल.

यासाठी संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दि. 2 ऑगस्ट, 2022 च्या पत्रान्वये माहिती संकलित करण्यासाठी प्रश्नावली उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या प्रश्नावली मधील माहिती भरुन अनुक्रमे नगर परिषद, वसमत, नगर परिषद कळमनुरी आणि नगर पंचायत औंढा नागनाथ या कार्यालयाकडे सादर करण्यात यावी. जनतेच्या सोयीसाठी प्रश्नावली मोबाईलद्वारे सादर करण्यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. नगर परिषद, वसमत साठी https://forms.gle/v8WgkJvm2hYrJse3A ही लिंक, नगर परिषद कळमनुरी साठी https://forms.gle/3qf23imGXPFXfJUX8 आणि नगर पंचायत औंढा नागनाथ साठी https://forms.gle/koMNaNpFKmnDkKAd7 ही लिंक आहे. त्याअनुषंगाने संबंधित संकेतस्थळावर जाऊन फॉर्म मध्ये वस्तुस्थितीदर्शक माहिती भरावी आणि शेवटी सबमिट बटनवर क्लिक करावे.

ही विकास योजना पुढील 20 वर्षासाठी आवश्यक सोयीसुविधांबाबत असून त्याअनुषंगाने माहिती भरुन           दि. 4 सप्टेबर, 2022 पर्यंत जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन नगर रचना अधिकारी तथा सहायक संचालक, नगर रचना दि. ग. सरपाते यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

****

 

लंपी स्कीन डिसीज रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये

यासाठी पशुपालकांनी काळजी घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्ह्यात सन 2019-20 मध्ये लंपी स्कीन डिसीज नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. या रोगामध्ये अंगावर गाठी येणे, त्यात पू तयार होणे, ताप, लंगडणे आदी लक्षणांचा समावेश असून या रोगात मृत्यूही ओढवतो. या रोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येते. तसेच हा आर गोचीड, गोमाशीमार्फत प्रसार होत असल्याने विविध उपाययोजना करुन गुरांचे गोठे व परिसर, गुरांवर आवश्यक ती औषधे वापरावी, गोचीड गोमाशांचे निर्मूलन करावे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांच्या गोठ्यात 20 टक्के इथर व क्लोरोफार्म, 1 टक्के फॉर्मलिन, 2 टक्के फिनॉल, आयोडिन जंतनाशके 1:3 प्रमाणात पाण्यामध्ये मिसळून फवारणी करण्यात यावी.

सद्यस्थितीत महाराष्ट्रात 7 जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. गुरांच्या खरेदी, विक्री, वाहतूक यामुळे आपल्या जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये याची काळजी घेण्यासाठी पशुपालकांनी सतर्क राहावेत. तसेच आपल्या गुरांना या रोगाची लागण झालेली निदर्शनास आल्यास आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळवून आवश्यक ते उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, हिंगोली यांनी केले आहे.

****

01 September, 2022

 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नेहरु युवा केंद्रामार्फत धावणे स्पर्धा

प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव

 


हिंगोली (जिमाका), दि. 01 : येथील नेहरु युवा केंद्र व भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाद्वारा आयोजित हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने व तसेच राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या अनुषंगाने दि. 29 ऑगस्ट, 2022 रोजी आदर्श कॉलेज मैदान येथे मुलांसाठी 1600 मीटर आणि मुलींसाठी 400 मीटर भव्य धावणे स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

ही स्पर्धा नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले रवि हनवते, सुधाकर पाईकराव, संदीप कांबळे यांनी युवकांना खेळाविषयी मार्गदर्शन केले. तसेच नेहरु युवा केंद्राचे हिंगोली तालुका समन्वयक प्रविण पांडे यांनी नेहरु युवा केंद्रामार्फत भारत सरकारच्या राबविल्या जाणा विविध खेळ स्पर्धाविषयी माहिती दिली व खेळाचे माणसाच्या आयुष्यातील महत्व समजावून सांगितले. तसेच ग्रामीण भागातील युवकांनी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

या स्पर्धेत 1600 मीटर मुलांमध्ये अनुक्रमे प्रथम,द्वितीय, तृतीय येणाऱ्या शिवाजी शिंदे, रामेश्वर जगताप, शेख मोसिम यांना आणि 400 मीटर धावणे स्पर्धेमध्ये मुलींमध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या अनुराधा साखरे, सुनिता जाधव, तन्वी घुगे यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन नेहरु युवा केंद्राचे तालुका युवा समन्वयक प्रवीण पांडे, संदीप शिंदे, बाळू नागरे, सिंधू केंद्रे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील युवा, युवती, नागरिक आदींची उपस्थिती होती.   

****

 

विकास योजनेमध्ये सार्वजनिक सोयी-सुविधांची आरक्षणे प्रस्तावित करण्यासाठी प्रश्नावली भरुन देण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : वसमत नगर परिषदेने ठराव क्र.07 दि. 11 फेब्रुवारी, 2021 अन्वये वसमत नगर परिषद हद्दीची विकास योजना, कळमनुरी नगर परिषदेने (मुळ हद्दीची दुसरी सुधारीत व अतिरिक्त क्षेत्राची सुधारीत) विकास योजना आणि नगर पंचायत औंढा नागनाथ ठराव क्र. 02 दि. 03 मार्च, 2021 अन्वये औंढा नगर पंचायत हद्दीची विकास योजना तयार करण्यासाठी  महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम -23 (1) सह कलम-38 अन्वये इरादा जाहीर केला आहे.

विकास योजनेमध्ये आवश्यक सार्वजनिक सोयी-सुविधांची आरक्षणे प्रस्तावित करण्यासाठी शहरातील स्थानिक जनतेचा सहभाग असणे आवश्यक आहे. जेणेकरुन जनतेच्या विकास योजनेबाबतच्या अपेक्षा व शहराची खरीखुरी निकड याबाबतची माहिती संकलित करणे यामुळे शक्य होईल.

यासाठी संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दि. 2 ऑगस्ट, 2022 च्या पत्रान्वये माहिती संकलित करण्यासाठी प्रश्नावली उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या प्रश्नावली मधील माहिती भरुन अनुक्रमे नगर परिषद, वसमत, नगर परिषद कळमनुरी आणि नगर पंचायत औंढा नागनाथ या कार्यालयाकडे सादर करण्यात यावी. जनतेच्या सोयीसाठी सदर प्रश्नावली मोबाईलद्वारे सादर करण्यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून त्याची लिंक https://forms.gle/v8WgkJvm2hYrJse3A ही आहे. त्याअनुषंगाने या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म मध्ये वस्तुस्थितीदर्शक माहिती भरावी आणि शेवटी सबमिट बटनवर क्लिक करावे.

ही विकास योजना पुढील 20 वर्षासाठी आवश्यक सोयीसुविधांबाबत असून त्याअनुषंगाने माहिती भरुन दि. 4 सप्टेबर, 2022 पर्यंत जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन नगर रचना अधिकारी तथा सहायक संचालक, नगर रचना दि. ग. सरपाते यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

****

 

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार

सहभागी होणाऱ्या मंडळासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 01 :  राज्य शासनाने दि. 31 ऑगस्ट, 2022 रोजीपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुरस्कार देण्यासाठी निवड करण्याची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे.

या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतेलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.   

पुरस्कार निवडीसाठी निकष :

मूर्ती  पर्यावरणपूरक असावी. सजावट पर्यावरणपूरक म्हणजेच यात थर्माकोल, प्लॅस्टीक आदी साहित्य असता कामा नये. गणेश मंडळाचे वातावरण ध्वनीप्रदुषण रहित असावे. पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा इत्यादी समाज प्रबोधन विषयावर देखावा / सजावट असावी. स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा / सजावट याला अधिक गुण दिले आहेत. रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबीर, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत केलेल्या कार्याचे मूल्यमापन होईल. महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत मंडळाचे कार्य असावे. पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम / स्पर्धा, पारंपारिक / देशी खेळाच्या स्पर्धा याचबरोबर गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा यात पाणी, प्रसाधनगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे नियोजन, आयोजनातील शिस्त याबाबी प्राधान्याने गुण देताना विचारात घेतल्या जाणार आहेत. अर्ज करताना कोणतेही शूल्क आकारण्यात येणार नाही.

वरील बाबींची पूर्तता करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांने परिशिष्ट अ मध्ये अर्ज करावयाचा आहे. तसेच राज्य शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in , पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर व दर्शनिका विभागाच्या https://mahagazetters.com या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विहित नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेल वर दि. 02 सप्टेंबर, 2022 पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ विजेत्यांची निवड करण्यासाठी शासन निर्णयातील निकषाच्या आधारे कार्यवाही करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास आघाव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कुरमुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची या समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही निवड समिती गणेशोत्सव उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन व्हिडिओ व आवश्यक कागदपत्र गणेशोत्सव मंडळाकडून प्राप्त करुन घ्यावेत. या समितीने प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत दिलेल्या निकषानुसार गुणांकन करुन त्यातील एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची संबंधित कागदपत्रे, व्हिडिओ व गुणांकन राज्य समितीकडे दि. 13 सप्टेंबर, 2022 पर्यंत सादर करावीत.

जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस केलेल्या 36 गणेशोत्सव मंडळामधून विजेते निवडण्यासाठी राज्यस्तरावर समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये सर जे.जे. कला विद्यालयाचे अधिष्ठाता/वरिष्ठ प्राध्यापक, पोलीस महासंचालक कार्यालयातील वरिष्ठ गट-अ मधील अधिकारी यांचा समावेश आहे.

राज्यस्तर समिती ही जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येकी एक याप्रमाणे 36 शिफारस प्राप्त गणेशोत्सव मंडळामधून गुणांकनाच्या अधारे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करतील, असे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.     *****