22 November, 2016

मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध
हिंगोली, दि. 22 :  मा. अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल मुंबई यांनी या गटास पोलीस कर्मचारी यांचे ड्रिल, गॅस ॲम्युनेशन, 7.62 एमएम एकेएम, एमएमजी, 5.56 इंसास, एलएमजी, स्टेस मॅनेजमेंट सत्र क्र. 6 व 7 चे वार्षिक गोळीबार सरावसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना वार्षिक निरिक्षण गोळीबार सराव देण्यात येणार आहे. त्याकरिता दि. 23 नोव्हेंबर, 2016 ते 24 डिसेंबर, 2016 या कालावधीत पोलीस कर्मचारी यांचा गोळीबार सरावाकरिता मौजे वगरवाडी ता. औंढा स. न. 25 व 29 मधील गोळीबार मैदान ( फायर बट ) उपलब्ध करुन मिळण्याची केली होती.  महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33(1) (ख) व (प) नुसार मौजे वगरवाडी ता. औंढा ना. जि. हिंगोली येथील फायरींग रेंज मैदान वरील कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे.
सदर ठिकाण धोकादायक क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात येत असून सदरील परिसरात गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना पोलीस अधिकारी यांनी दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे संबंधीत गावी सर्व संबंधितांना देण्यात याव्यात, व तहसिलदार औंढा ना. व पोलीस स्टेशन हटृा यांना मौजे वगरवाडी फायरींग बट व परिसरात दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे सदरील आदेशाची प्रसिध्दी करावी, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.

                                                            ***** 

21 November, 2016

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित
हिंगोली, दि. 21: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन आदेश दि. 11 नोव्हेंबर 2016 अन्वये महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यांकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यानूसार हिंगोली जिल्ह्याकरिता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाचे उद्घाटन आज जात प्रमाणपत्र पडताळणीचे अध्यक्ष श्री. तिटकरे यांच्या हस्ते झाले. सदर समिती कार्यालय हे आज पासून कार्यान्वीत झाले आहे.
            यावेळी सदस्य सचिव जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. कुंभारगवे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे, सदस्य श्री. गोडबोले यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


*****

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ अंतर्गत
 बीज भांडवल  कर्ज योजनेसाठी लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 21 : महाराष्ट्र राज्यात ज्या जाती जमातीसाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात  नाही अशा जाती  जमातीच्या अर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे बीज भडवल कर्ज योजना राबविली जाते यामध्ये बॅकेचा सहभग 60 टक्के असून उमेदवारांचा सहभाग 05 टक्के व 35 टक्के रक्कम अण्णासाहेब आर्थिक विकास मंहमंडळाकडून बीज भाडवल येाजनेसाठी देण्यात येते.

 सदर 35 टक्के रक्कमेवर 4 टक्के व्याज आकारण्यात येते. कर्ज परत फेडीचा कालावधी 5 वर्षाचा आहे. या योजनेचा फायदा अधिक तत्परतेने पारदर्शकपने सहज उपलब्ध व्हावा याकरिता महामंडळातर्फे आता (www.mahaswayamrojgar.maharashtra.gov.in) या संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेत स्थळावर उमेदवारांना रोजगारासाठी कर्ज अर्ज ऑनलाईन भरणे, कर्ज योजनेसाठी आवश्यक पात्रता अटी व शर्ती, कर्ज मंजूर होण्यापूर्वी तसेच कर्ज मंजूर झाल्यावर सादर करावयाची कागदपत्रे इत्यादीची माहिती, ऑन लाईन  सादर केलेल्या अर्जाची सद्य:स्थिती तपासने, कर्ज परतफेडीची  सद्य:स्थिती पाहने व कर्ज फेडीच्या हप्त्याची पररिगणना (EMI ) कॅलक्युलेटर करणे अशा सूविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत बीज भाडवल कर्ज योजने अंतर्गत हिंगोली जिल्हयासाठी चालू वर्षा करिता 80  लाभार्थी प्राप्त करण्याचे  उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत. यासाठी उपरोक्त संकेत स्थळाचा वापर करुन लाभ घेऊन सुशिक्षीत बेरोजगारानी ऑन लाईन अर्ज सादर करावा. असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भ्रमनध्वनी क्रमांक 9423576047 व 9823225556, तसेच दूरध्वणी क्र. 022-28342521/22/23/24/25 आणि 022-22657662 व 02456-224574 वर संपर्क साधावा.                                     *****
भारत सरकार शिष्यवृत्ती विषयी महाविद्यालयींन प्राचार्यांची बैठ
हिंगोली, दि. 21 :  भारत सरकार शिष्यवृत्ती संदर्भात दिनांक 25 नोव्हेंबर, 2016 सकाळी 11.00 वाजता जिल्हयातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक आयोजित केलेली असून सदर बैठकीमध्ये सन 2016-2017 च्या भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क योजनेचा महाविद्यालय निहाय भरलेल्या अर्जांचा तसेच सन 2014-2015 व 2015-2016 च्या प्रलंबित प्रकरणाबाबत आढावा घेण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन प्रक्रियेसंदर्भात आवश्यक असलेली संपुर्ण माहिती देण्यात येऊन महाविद्यालयनिहाय असलेल्या अडचणी लेखी स्वरुपात स्विकारण्यात येणार आहेत. आणि सन 2015-2016 पर्यंत मंजूर झालेल्या शिष्यवृत्ती व शिक्षण फी व परिक्षा फी या योजनांच्या या कार्यालयामध्ये असलेल्या अर्जांच्या मुळ प्रती महाविद्यालयास हस्तांतरीत करण्यात येणार आहेत.
तरी दिनांक 25 नोव्हेंबर, 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथे बैठकीसाठी उपस्थित राहावे. ज्या महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा शिष्यवृत्ती संदर्भांत काम पाहणारे कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, अशा महाविद्यालयाचे विद्यार्थी  समाज कल्याण विभागामार्फत कोणत्याही शैक्षणिक योजनेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य व संबंधित विद्यार्थी यांची राहिल, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

*****

19 November, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात
इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ

हिंगोली, दि. 19 : - इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्तची शपथही सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील आदी विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.

                                                            **** 



18 November, 2016

बीपीएल कार्ड धारकांना साखरेचे माहे डिसेंबर महिन्यासाठी
1433 क्विंटलचे नियतन मंजुर
        हिंगोली, दि. 18 :  जिल्ह्यासाठी बीपीएल कार्डधारकांना माहे डिसेंबर - 2016 या महिन्याकरीता  तालुक्याचे नाव, गोदामाचे नाव आणि नियतन खालील प्रमाणे गोडावुन निहाय साखरेचे नियतन मंजुर केले आहे. (सर्व आकडे क्विंटलमध्ये) हिंगोली, शासकीय गोदाम, हिंगोली - 373, औंढा नागनाथ, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 180, सेनगाव, शासकीय गोदाम, हिंगोली  ( स्थित ) - 285, कळमनुरी, तहसिल कार्यालय जवळ शासकीय गोदाम, कळमनुरी - 360, वसमत, शासकीय गोदाम, वसमत - 235 एकूण 1433, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        ***** 
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेतंर्गत
 अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 18 :  अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्याकरिता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध व्यवसायाचे शासनमान्य्‍ संस्थेमार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येते. उदा. संगणक (एमएस-सीआयटी), मोबाईल रिपेअरिंग, फोटोग्राफी, ब्युटीपार्लर, इत्यादी व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी सन 2016-17 वर्षाकरिता महामंडळाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जासोबत जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, इत्यादी कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्जासोबत फोटोसह जोडून महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला, हिंगोली येथे दि. 25 नोव्हेंबर, 2016 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

                                                            *****