16 March, 2018
15 March, 2018
आंतरराष्ट्रीय नेमबाज नितीन चव्हाण यांना आमदार निधीतून रायफलचे वितरण
आंतरराष्ट्रीय नेमबाज नितीन चव्हाण यांना
आमदार निधीतून रायफलचे वितरण
हिंगोली,दि.15: सेनगाव तालूक्यातील हत्ता
(नाईक) या गावातील आंतरराष्ट्रीय नेमबाज नितीन आत्माराव चव्हाण यांना आमदार तान्हाजी
मुटकूळे यांच्यास आमदार निधीतून रायफलचे आज जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते
वितरण करण्यात आले.
यावेळी
जिल्हा क्रिडा अधिकारी श्री. पवार जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, सहायक नियोजन
अधिकारी श्री. आव्हाड यांची उपस्थिती होती.
नेमबाज
चव्हाण यांनी 10 मीटर एअर रायफल आणि 50 मीटर पॉईंट टू-टू रायफल या प्रकारात आंरराष्ट्रीय,
राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. सन 2012 ते
2016 सलग 4 वर्ष त्यांची भारतीय संघात निवड झाली आहे. 7 वेळा राष्ट्रीय स्पर्धेत भाग
घेवून 4 सुवर्ण तर 7 रौप्य आणि 1 कांस्य पदक
मिळविण्याची कामगिरी केली आहे. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत् 3 सुवर्ण तर 2 रौप्य
आणि 2 कांस्य पदकाची कामगिरी केली आहे.
00000
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जल व मृदसंधारणाच्या कामांसाठी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजना
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत
जल व मृदसंधारणाच्या
कामांसाठी यंत्रसामग्री व्याज
अर्थसाह्य योजना
हिंगोली,दि.15: राज्यातील जलयुक्त शिवार
अभियान/जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृध्दी
यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय योजना
सुरु करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने दिनांक 2 जानेवारी 2018 रोजी घेतला आहे. या निर्णयान्वये राज्यात जलयुक्त शिवार अभियान
/ जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी सुशिक्षित
बेरोजगार तरुण / शेतकरी उत्पादक संस्था/ नोंदणीकृत शेतकरी गटास / सुशिक्षित बेरोजगारांच्या सहकारी संस्था
विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना
आवश्यक ते प्रशिक्षण देऊन त्यांना उत्खनन यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी
वित्तीय संस्थांकडून कमाल कर्ज मर्यादा
रुपये 17.60 लाख उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या कर्जावरील 5 वर्षांच्या 5.90 लाख रुपये व्याजाचे
दायित्व शासनातर्फे अदा करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यात
एकूण 241 अर्ज प्राप्त झाले होते .
महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभागाचे शासन निर्णय दिनांक 5 मार्च 2018 अन्वये दिलेल्या
निकषा प्रमाणे प्रथम टप्प्यामध्ये या
योजनेत प्राप्त 241 अर्जाची समिती मार्फत छाननी करुन
143 अर्जदारांची शिफारस करण्यात आली होती . या शिफारस केल्यापैकी 120 सुशिक्षित बेरोजगार
अर्जदाराची यादी महाऑन लाईनवर प्रसिध्द
करण्यात आली आहे . सदरील यादी जिल्हा
उपनिबंधक , सहकारी संस्था , हिंगोली
कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे . हिंगोली जिल्ह्यासाठी
50 लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे . सदर योजनेसाठी सध्या नोटीस
बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेल्या अर्जांच्या बाबतीत दिनांक 5 मार्च 2018 च्या शासन निर्णयातील
निकषाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे .
पात्र अर्जदारांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचेकडील अधिकृत
परवानाधारक असलेल्या जिल्ह्यातील वित्तीय
संस्थेकडून सदर योजनेअंतर्गत शासन निर्णयाप्रमाणे विनाअट
कर्ज मंजुरीचे पत्र आपल्या लॉग इन
आयडीद्वारे दिनांक 23 मार्च 2018 पर्यंत ऑनलाईन
सादर करावे , कर्ज मंजुरी पत्रामध्ये शासनाचे दायित्व , शासनाकडून अनुज्ञेय असलेल्या व्याजाच्या परताव्याच्या रक्कमेकरीता कर्जाच्या
रकमेची कमाल मर्यादा रु. 17.60 लाख राहील व त्यानुसार
5 वर्षांमध्ये शासनामार्फत कमाल व्याज
परतावा रक्कम रु. 5.90 लक्ष पर्यंत
राहील , अशी अट वित्तीय संस्थेस मान्य असल्याचे स्पष्ट नमूद असावे , ज्यांनी बँकेचे
पत्र अपलोड केले आहेत त्यांची समितीमार्फत छाननी नंतर जिल्ह्यातील लक्षांकापेक्षा अधिक अर्जदारांनी वित्तीय संस्थेचा कर्ज मंजुरीचा
दाखला सादर केल्यास जिल्हास्तरीय
समितीद्वारे जाहीर सोडत काढून लॉटरी पध्दतीने लाभार्थी
निवड होईल असे जिल्हा उपनिबंधक यांनी कळविले आहे .
00000
वृत्त क्र.75
राष्ट्रीय
युवा स्वयंसेवक या पदासाठी मुदतवाढ
हिंगांली,दि.15:राष्ट्रीय युवा स्वयंसेवक
या पदासाठी दिनांक 13 मार्च पर्यंत
अर्ज मागविण्यात आले होते . परंतू या पदासाठी
दिनांक 31 मार्च 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे . तरी www.nyks.org या संकेतस्थळावर जाऊन माहिती
अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा युवा समन्वयक चंदा रावळकर यांनी केले आहे .
00000
14 March, 2018
कळमनुरी येथे महिला व युवतींकरीता हेअर स्टाईल व मेकअपचे तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
कळमनुरी
येथे महिला व युवतींकरीता हेअर स्टाईल व मेकअपचे
तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
हिंगांली,दि.14: कळमनुरी येथे दिनांक 8 मार्च
च्या महिला दिनानिमित्त महिला व युवतींकरिता हेअर स्टाईल व मेकअपचे तीन दिवसीय कार्यशाळेचे
आयोजन दिनांक 26 ते 28 मार्च 2018 या कालावधीत घेण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा
उद्योग केंद्र यांच्याद्वारा आयोजित करण्यात
येत आहे . या कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
आहे .
00000
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना वंचित
छत्रपती
शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना वंचित
शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 31 मार्च पर्यंत अर्ज
करण्याचे आवाहन
हिंगांली,दि.14: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्ज माफीसाठी 31 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे
आवाहन महाराष्ट्र शासनाचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 या योजनेअंतर्गत
यापूर्वीच्या विहीत कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन
पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करुन योजनेचे लाभ देण्यास शासनाने मान्यता
दिली आहे. यानुसार सदरचे वंचित शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचा कालावधी दि.
1 मार्च ते दि. 31 मार्च, 2018 असा असणार आहे. मात्र यापूर्वी या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना
पुन्हा अर्ज करता येणार नाहीत.
सदर कालावधीत आपले सरकार सेवा
केंद्रामार्फत शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता
येतील , शेतकऱ्यांसाठी स्वत: किंवा आपले सरकार
सेवा केंद्रामार्फत माहिती भरुन ऑनलाईन अर्ज
भरण्याची सेवा नि:शुल्क आहे, सदर अर्ज करणाऱ्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील इतर
सदस्यांचे प्रमाणीकरण आधार क्रमांकाच्या आधारे बायोमॅट्रीक पध्दतीने किंवा
ओटीपीद्वारे केल्यानंतरच संबंधित अर्ज संपूर्ण माहितीसह अपलोड करण्यात येतील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या
www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक
क्रमांक 201802281949524602 असा आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेअंतर्गत दि. 31 मार्च, 2018 पर्यंत शेतकरी बांधवांनी ऑनलाईन
अर्ज भरण्याचे आवाहन सुधीर मैत्रेवार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे
.
0000
13 March, 2018
मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध
मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार
सरावासाठी उपलब्ध
हिंगोली,दि.13:
महाराष्ट्र जमीन महसूल
अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33(1) (ख)
व (प) नुसार मौजे वगरवाडी
ता. औंढा , जि. हिंगोली येथील फायरींग
रेंज सर्वे नं.25 व 29 या परिसरात दिनांक 14
मार्च ते 28 एप्रिल 2018 पर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांना वार्षिक गोळीबार सराव
करण्यास परवानगी देण्यात येत आहे .
दिनांक 14 , 21 24 , 28 व 31 मार्च आणि
3,7,11,18,21,25, आणि 28 एप्रिल 2018 या दिनांकांस खालील अटीवर गोळीबार
सरावासाठी मैदान उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर ठिकाण धोकादायक
क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले
आहे परिसरात गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा
सूचना पोलीस अधिकारी यांनी दवंडीद्वारे
व ध्वनीक्षेपकाद्वारे संबंधित गावी सर्व संबंधितांना द्याव्यात. तसेच तहसिलदार औंढा ना. व
पोलीस स्टेशन हट्टा यांनी मौ. वगरवाडी फायरींग बट व परिसरात दवंडीद्वारे
व ध्वनीक्षेपकाद्वारे या आदेशाची
प्रसिध्दी करावी, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे .
0000
लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ
लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ
हिंगोली,दि.13: गाय व
म्हैस वर्गीय जनावरांमध्ये
होणाऱ्या लाळ खुरकुत रोगामुळे
जनावराची उत्पादकता व कार्यक्षमता
कमी होऊन मोठ्या प्रमाणात पशुपालकांचे
आर्थिक नुकसान होऊ शकते. सदरील
रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात
ठेवण्याकरिता पशुसंवर्धन
विभागामार्फत वार्षिक दोन फेरीमध्ये संपूर्ण
राज्यात लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक
लसीकरण करण्यात येते . या
कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यास एकूण
3 लाख 42 हजार 300 लस मात्रा प्राप्त झालेल्या
असून जिल्ह्यातील संपूर्ण 100 टक्के
गाय व म्हैस वर्गीय
जनावरांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे .
सदरील लसमात्रा जिल्ह्यातील सर्व
पशुवैद्यकीय दवाखान्यास पुरवठा करण्यात आलेल्या असून जिल्ह्यात मोहीम स्वरुपात लसीकरण
राबविण्यात येणार आहे . ही मोहीम ही 21 दिवसांत पूर्ण करावयाची असून
दिनांक 14 मार्च पासून प्रत्यक्ष लसीकरणास प्रारंभ करण्यात येणार आहे . या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील
सर्व पशुपालकांनी लाळ खुरकुत
रोगापासून आपलया जनावरांचा बचाव
करण्याकरिता संबंधित पशुवैद्यकीय
दवाखान्यात संपर्क साधून आपापल्या जनावरांस लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण करवून घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन
विभागामार्फत करण्यात आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)