26 April, 2018

पालकमंत्री मा.ना. श्री. दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री मा.ना. श्री. दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा
        हिंगोली, दि.26:- राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि  विशेष सहाय, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. दिलीप कांबळे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे .  दिनांक 30 एप्रिल 2018(सोमवार) रोजी रात्री 08.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम , दिनांक 1 मे 2018(मंगळवार) रोजी  सकाळी 08.00 वाजता महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण (स्थळ – पोलीस कवायत मैदान, हिंगोली ), सकाळी 09.30 वाजता  शासकीय विश्रामगृह येथे राखीव ,  दुपारी 12.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून  शासकीय वाहनाने  जिंतूर मार्गे जालनाकडे प्रयाण..
00000

21 April, 2018

पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा दौरा रद्द


पालकमंत्री  दिलीप कांबळे यांचा दौरा रद्द

        हिंगोली,दि.21: हिंगोली जिल्ह्यात विधान परिषदे निवडणुकीसाठीची आचार संहिता लागु झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा सोमवार दिनांक 23 एप्रिल, 2018 रोजीचा दौरा रद्द झाल्याचे पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.
0000

विधान परिषद निवडणूक -2018 आचार संहिता लागू

 विधान परिषद निवडणूक -2018
आचार संहिता  लागू
       हिंगोली,दि.21: महाराष्ट्र  विधान परिषदेच्या  सहा स्थानिक  प्राधिकारी  मतदार संघाच्या द्विवार्षिक  निवडणूक  2018 चा कार्यक्रम  भारत निवडणूक  आयोगाने जाहिर केला  असून दिनांक 20 एप्रिल 2018 पासून आचारसंहिता लागू झाला आहे . त्याप्रमाणे निवडणुक कार्यक्रम असा आहे -  निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द  करण्याचा दिनांक 26 एप्रिल 2018(गुरुवार),  नामनिर्देशन पत्रे सादर  करण्याचा अंतिम दिनांक  3 मे 2018(गुरुवार) नामनिर्देशन पत्रांची छाननी  दिनांक 4 मे 2018 (शुक्रवार) ,  उमेदवारी अर्ज मागे  घेण्याचा  अंतिम दिनांक  7 मे 2018 (सोमवार )  मतदानाचा दिनांक  21 मे 2018 (सोमवार) , मतदानाची  वेळ  सकाळी 8 ते  सायंकाळी 4 वाजेपर्यंत, मतमोजणीचा  दिनांक  24 ते 2018 (गुरुवार) ,  निवडणुक  प्रक्रिया  पूर्ण  करण्याचा दिनांक 29 मे 2018 (मंगळवार) असे  जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी , हिंगोली यांनी कळविले आहे .
0000

जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल 2018


जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल 2018
      
हिंगोली,दि.21:  हिवतापाचा  प्रसार ॲनॉफिलीस  डासाच्या मादीपासून होतो. या डासाची  उत्पत्ती  स्वच्छ साठवून राहिलेल्या  पाण्यात होते . उदा. भातशेती , स्वच्छ पाण्याची डबकी , नाले , नदी , पाण्याच्या  टाक्या , कालवे इत्यादीमध्ये  होते . हिवताप प्रसारक  ॲनॉफिलीस  डासाची  मादी हिवताप  रुग्णास  चावल्यावर  रक्ताबरोबर  हिवतापाचे  जंतू  डासाच्या पोटात जातात . तेथे वाढ होऊन  डासांच्या  लाळेवाटे  निरोगी  मनुष्याच्या शरीरात  सोडले जातात. निरोगी  मनुष्याच्या शरीरात  हे जंतू  यकृतामध्ये  जातात  व तेथे  त्याची  वाढ होऊन  10 ते 12 दिवसांनी  मनुष्याला  थंडी वाजून ताप येतो.  हिवतापाची लक्षणे – थंडी वाजून ताप येणे ,  ताप हा  सततचा असू शकतो  किंवा एक दिवस  आड येऊ शकतो , नंतर घाम  येऊन अंग गार पडते ,  डोके दुखते ,  बऱ्याच वेळा  उलट्या  होतात, हिवतापाचे निदान – हिवतापाच्या निश्चित निदानासाठी तापाच्या रुग्णाचा रक्त नमुना  घेऊन तो सुक्ष्म दर्शकाखाली  तपासणे  आवश्यक असते . हिवताप  उपचार सुधारीत  उपचार पध्दती रक्त नमुना  संशयित  हिवताप  रुग्णाचा  रक्तनमुना  घेऊन  हिवताप रुग्ण  दुषित  आल्यावर त्यांना  वयोगटानुसार  क्लोरोक्वीन गोळ्यांची  पूर्ण मात्रा  द्यावी  व सुक्ष्मदर्शकाद्वारे  रक्तनमुने  तपासणी अंती हिवतापाचे  निश्चित  निदान  झाल्यावर  संबंधित  रुग्णास  जंतूच्या प्रकारानुसार  योग्य तो  औषधोपचार  देण्यात यावा , किटकजन्य रोगांना प्रतिबंध – हिवताप  , डेंगू , चिकुनगुनिया  हे सर्व रोग  स्वच्छ पाण्यात  डास अंडी घालून  त्यापासून  डास  अळी व नंतर डास तयार  होतात याला  प्रतिबंध  करण्यासाठी  घरातील  सर्व पाणीसाठे  आठवड्यातून एक दिवस  धुवून  पुसुन  कोरडे  करणे आवश्यक आहे .  घाण पाण्यात  क्यलेक्स  डासाची  मादी अंडी घालते  व त्यापासून  हत्तीरोगाची  लागण  होते म्हणून  आपल्या परिसरातील  सर्व नाल्या वाहत्या  होतील. डबकी , खड्डे  यांच्यात पाणी साचून  राहणार नाही यांची काळजी घेतली तर हिवताप , डेंगू , चिकुनगुणिया , हत्तीरोग होण्यात  प्रतिबंध होऊ शकतो असे  आवाहन  जिल्हा हिवताप  अधिकारी डॉ. जि.के. चव्हाण  यांनी  केले आहे .
00000

महाबीजचा खरीप बिजोत्पादन कार्यक्रम 20 एप्रिल ते 10 मे दरम्यान


महाबीजचा खरीप बिजोत्पादन कार्यक्रम  20 एप्रिल  ते 10 मे दरम्यान
       हिंगोली,दि.21: महाबीज मार्फत खरीप हंगाम 2018-19 साठी सोयाबीन , उडीद या पिकांचे प्रमाणित/ पायाभूत  बियाणे उत्पादन  करण्यासाठी  अग्रीम आरक्षण योजना  सुरु झाली आहे. जिल्ह्यातील  बिजोत्पादक  शेतकऱ्यांनी  या कार्यक्रमात  सहभागी व्हावे  तसेच आरक्षण कालावधी  दिनांक 20 एप्रिल ते 10 मे 2018 पर्यंत आहे . यात सोयाबीन जेएस-335,  एमएयुएस-71, एमएयुएस-158 , एमएयुएस 162 , उडीद टीएयु-1 या वाणांचे  पायाभूत  बियाणे उपलब्ध होणार आहेत.  यासाठी शेतकऱ्यांनी  साताबारा , आठ –अ (होल्डींग) , आधार कार्ड  आणि बँक  खात्याची झेरॉक्स प्रत देणे  आवश्यक आहे. तसेच एका  गावात कमीत कती 50 एकर  बिजोत्पादन कार्यक्रम राबविणे  आवश्यक आहे . तरी इच्छुक शेतकऱ्यांनी प्लॉट नं. सी.16 एमआयडीसी, लिंबाळा मक्ता , हिंगोली येथे महाबीज  जिल्हा कार्यालयाशी  संपर्क करावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महाबीज , यांनी केले आहे.
000000