21 April, 2018

महाबीजचा खरीप बिजोत्पादन कार्यक्रम 20 एप्रिल ते 10 मे दरम्यान


महाबीजचा खरीप बिजोत्पादन कार्यक्रम  20 एप्रिल  ते 10 मे दरम्यान
       हिंगोली,दि.21: महाबीज मार्फत खरीप हंगाम 2018-19 साठी सोयाबीन , उडीद या पिकांचे प्रमाणित/ पायाभूत  बियाणे उत्पादन  करण्यासाठी  अग्रीम आरक्षण योजना  सुरु झाली आहे. जिल्ह्यातील  बिजोत्पादक  शेतकऱ्यांनी  या कार्यक्रमात  सहभागी व्हावे  तसेच आरक्षण कालावधी  दिनांक 20 एप्रिल ते 10 मे 2018 पर्यंत आहे . यात सोयाबीन जेएस-335,  एमएयुएस-71, एमएयुएस-158 , एमएयुएस 162 , उडीद टीएयु-1 या वाणांचे  पायाभूत  बियाणे उपलब्ध होणार आहेत.  यासाठी शेतकऱ्यांनी  साताबारा , आठ –अ (होल्डींग) , आधार कार्ड  आणि बँक  खात्याची झेरॉक्स प्रत देणे  आवश्यक आहे. तसेच एका  गावात कमीत कती 50 एकर  बिजोत्पादन कार्यक्रम राबविणे  आवश्यक आहे . तरी इच्छुक शेतकऱ्यांनी प्लॉट नं. सी.16 एमआयडीसी, लिंबाळा मक्ता , हिंगोली येथे महाबीज  जिल्हा कार्यालयाशी  संपर्क करावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महाबीज , यांनी केले आहे.
000000

No comments: