13 April, 2018

जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू


वृत्त क्र. 97                                                                          
जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
हिंगोली, दि. 13 :  जिल्ह्यात येणाऱ्या कालावधीत दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती असून तसेच   शिक्षकांचे  आंदोलन , मराठा आरक्षण,  श्री. प्रकाश आंबेडकर अध्यक्ष भारीप  बहुजन  महासंघ यांच्या  नेतृत्वात  संभाजी भिडे  यांना भिमा कोरेगाव  दंगलीच्या  अनुषंगाने  अटक करण्याच्या मागणीसाठी  मोर्चे निघत असून तसेच काही  संघटना या  संभाजी भिडे यांना अटक करु नये या मागणीसाठी  मोर्चाचे आयोजन करत  आहेत . त्यामुळे  संघटनांमध्ये  तीव्र  असंतोषाचे  वातावरण आहे . तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव , शेतकऱ्यांना  वीज जोडणी , लोडशेडींग अशा वेगवेगळ्या  प्रश्नांमुळे मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको अशा विविध  प्रश्न हाताळण्यासाठी  व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता  संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दिनांक 9 एप्रिल  रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 23 मार्च  2018 रोजीचे  24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील याउद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
      

No comments: