18 April, 2018

क्रिडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरीता क्रिडा नैपुण्य चाचणी


क्रिडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरीता क्रिडा नैपुण्य चाचणी
हिंगोली, दि. 18: शासनाने दि. 18 नोव्हेंबर, 1995 च्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये पुणे येथे क्रीडा विद्यापीठाने 14 ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे येथील क्रीडा संकुलात शिवछत्रपती क्रीडापीठ व राज्यामध्ये 11 ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. या 11 क्रीडा प्रबोधिनीमध्ये दरवर्षी 8 ते 14 वर्षे वयोगटातील मुला-मुलींची भारतीय खेळ प्राधिकरणाने पुरस्कृत केलेल्या बॅटरी ऑफ स्टेट, (क्रीडा नैपुण्य चाचणी) व सरळ प्रवेश भरती प्रक्रियेद्वारे निवड करुन क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यात येतो.
सन 2018-19 साठी शिवछत्रपती क्रीडापीठातंर्गत विविध 11 क्रीडा प्रबोधिनीत बॅटरी ऑफ टेस्टद्वारे व सरळ प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश देण्यास मान्यता मिळाली आहे.बॅटरी ऑफ टेस्टमध्ये 1) वजन 2) उंची 3) 30 मी. भरधाव धावणे 4) 6 x 10 मी. शटल रन 5) उभी लांब उडी 6) उभी उंच उडी 7) मेडिसीन बॉल थ्रो 8) लवचिकता 9) 800 मी धावणे या 9 चाचण्यांचे एकूण 27 गुणांपैकी 17 किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या मुला-मुलींना क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यात येतो.
सन 2018-19 या वर्षाकरीता आयोजित करावयाच्या क्रीडा नैपुण्य चाचण्यासाठी मुला-मुलींचे वयोगट खालील प्रमाणे आहे.
वयोगट
जन्म तारीख
14 वर्ष वयोगट
01/07/2004 व तदनंतरची असावी
13 वर्ष वयोगट
01/07/2005 व तदनंतरची असावी
12 वर्ष वयोगट
01/07/2006 व तदनंतरची असावी
11 वर्ष वयोगट
01/07/2007 व तदनंतरची असावी
10 वर्ष वयोगट
01/07/2008 व तदनंतरची असावी
9 वर्ष वयोगट
01/07/2009 व तदनंतरची असावी
8 वर्ष वयोगट
01/07/2010 व तदनंतरची असावी
सन 2018-19 या वर्षाकरीता नवीन प्रवेश देण्यासाठी 8 ते 14 वयोगटातील मुला-मुलींच्या क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे ( बॅटरी ऑफ स्टेट) आयोजन करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम प्रस्थापित करण्यात येत आहे.
क्रीडा नैपुण्य चाचण्या (बॅटरी ऑफ टेस्ट) आयोजनाचा कालबद्ध कार्यक्रम सकाळी 10.00 वाजता खालील दर्शविलेल्या दिनांक व ठिकाणी आयोजित करण्यात येईल.
अ.क्र.
कार्यक्रमाचे स्वरुप
क्रीडा नैपुण्य चाचण्या राबविण्याचा दिनांक
तालुका
आयोजनाचे ठिकाण
1
तालुकास्तरील चाचण्यांचे आयोजन
21 एप्रिल 2018
कळमनुरी
तालुका क्रीडा संकुल, कळमनुरी
21 एप्रिल 2018
हिंगोली
जिल्हा क्रीडा संकुल, हिंगोली
21 एप्रिल 2018
सेनगांव
तोष्णीवाल महाविद्यालय, सेनगांव
21 एप्रिल 2018
औंढा (ना)
शारीरिक शिक्षण महाविद्यालय, जवळा बाजार
21 एप्रिल 2018
वसमत
बहिर्जी स्मारक विद्यालय, वसमत
2
जिल्हास्तरावरील चाचण्यांचे आयोजन
24  ते 25 एप्रिल 2018

शारीरिक शिक्षण महाविद्यालय, जवळा बाजार
                वरील तारखानिहाय शाळास्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे काटेकोर व पारदर्शक पद्धतीने आयोजन करुन एकूण 9 चाचण्यांमध्ये 17 किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या खेळाडूंची अंतिम मूळ यादी व सविस्तर अहवालाची मूळ प्रत उपरोक्त तालुकास्तर चाचणीच्या वेळी खेळाडूंसोबत घेऊन यावी व जिल्हास्तर चाचणीच्या वेळी तालुका क्रीडा संयोजक यांनी तालुकास्तरावरील पात्र खेळाडूंची यादी व अहवाल या कार्यालयात किंवा जिल्हास्तर चाचणीच्या वेळी म्हणजेच दि. 24 एप्रिल 2018 पर्यंत या कार्यालयास सादर करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
00000

No comments: