11 April, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन






जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
            हिंगोली, दि. 11 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
            यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी (नरेगा) खुदाबक्श तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनीही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
*****

No comments: