14 April, 2018


जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

            हिंगोली, दि. 14 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) पांडुरंग बोरगावकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीराम पारवेकर यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
*****

No comments: