03 April, 2018

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
हिंगोली, दि.03: आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावर विविध विषयांत युवांनी पार पाडलेल्या भुमिका योगदान यामुळे युवांची एक अद्वितीय समूह अशी ओळख समाजात निर्माण झालेली आहे . युवा हा  समाजाचा अविभाज्य घटक असून विकास प्रक्रियेतील आवश्यक भाग आहे. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 च्या विकासासाठी  राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 15 ते 35 वयोगटातील युवक-युवतींना जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित  करण्यात येणार असून पुरस्कारासाठी पात्रतेचे स्वरुप,अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.
जिल्हा युवा पुरस्कारासाठी जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर एक युवक , एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. सदरचा पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम  रु. 10 हजार (प्रति युवक व युवतींसाठी), प्रति संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह रोख रक्कम रु. 50 हजार अशा स्वरुपाचा असेल.
युवक युवतींसाठी पात्रतेचे निकषअर्जदार युवक युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्ष पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षपर्यंत असावे, जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग  5 वर्ष वास्तव्य असणे आवश्य आहे, पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस पुरस्कार जिल्ह्यातून दिला जाणार, पुरस्कार मरणोत्तर जाहिर करण्यात येणार नाही, केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील (उदा. वृत्तपत्रकात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ. ),अर्जदार युवक युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे.
पात्रतेचे निकष – संस्था – पुरस्कार संस्थेस जिल्ह्यातून दिला जाणार , संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहिल. (उदा. वृत्तपत्रकात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ.), अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे, अर्जदार संस्था विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार पंजीबद्ध असावी, अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान 5 वर्ष कार्यरत असणे आवश्यक आहे, अर्जदार    संस्थांचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. अधिक माहितीसाठी जिल्हा  क्रीडा अधिकारी  कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे .
000000

No comments: