30 July, 2018

शेंदरी बोंडअळीवरील प्रतिबंधक उपाय


शेंदरी बोंडअळीवरील प्रतिबंधक उपाय
      हिंगोली, दि.30: लवकर लागवड झालेल्या कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव कापसाच्या फुलामध्ये अळी दिसून येत आहे. ही अळी शेंदऱ्या रंगाची असून फुलातील पुंकेसर खात आहे. या शेंदऱ्या बोंडअळीमुळे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी फेरामेन ट्रॅप्स, लाईटट्रॅप्स, स्टिकी ट्रॅप्सचा वापर  करावा. तसेच निंबोळी अर्काची फवारणी करावी त्याच बरोबर बाजारात  उपलब्ध असलेल्या रासायनिक किटकनाशकांची फवारणी करुन शेंदरी बोंडअळीचा बंदोबस्त करावा. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व्ही.डी. लोखंडे यांनी केले आहे.
000000

जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू


जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
        हिंगोली,दि.30:जिल्ह्यात  दिनांक 1 ऑगस्ट रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे  जयंती साजरी होणार आहे तसेच दिनांक 12 ऑगस्ट रोजी पासून श्रावण महिना सुरु होत असून दर श्रावण सोमवार निमित्त औंढा नागनाथ मंदिरामध्ये तसेच जिल्ह्यात  इतर ही मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात  भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी होत असते. मंदिरामध्ये धार्मिक कीर्तन,पालखीचे आयोजन होते, तसेच नर्सी नामदेव येथे परतवारी निमित्त दिनांक 8 ऑगस्ट 2018 रोजी मोठ्या प्रमाणात  भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. तसेच सकल मराठा आरक्षण संबंधाने हिंगोली जिल्ह्यात विविध प्रकारचे मोर्चे, आंदोलने, रास्तारोको, उपोषणे सुरु असून अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध  प्रश्न हाताळण्यासाठी  व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दिनांक 31 जुलै रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 13 ऑगस्ट, 2018 रोजीचे  24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000

23 July, 2018

जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते लोकराज्य वारी विशेषांकाचे प्रकाशन


जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते लोकराज्य वारी विशेषांकाचे प्रकाशन
        हिंगोली, दि.23: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य मासिकाच्या माहे ऑगस्ट, 2018 च्या वारी या विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते निलंगा येथे करण्यात आले.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

लोकराज्य ‘वारी’ संग्राह्य विशेषांक
            पंढरपुरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. यंदाच्या वारीत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘संवादवारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोकराज्यच्या या विशेषांकाचे आज प्रकाशन करण्यात आले.
            या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या महसूलमंत्री श्री.पाटील यांनी ‘रंगले हे चित्त माझे विठुपायी’ असे म्हणत वारकऱ्यांसाठी संदेश दिला आहे. अंकामध्ये श्रीपाद अपराजित, डॉ.द.ता. भोसले, श्रीधरबुवा देहूकर, संदेश भंडारे, बाळासाहेब बोचरे, डॉ. यू.म.पठाण, प्रा. राम शेवाळकर, डॉ. प्रतिमा इंगोले, जयंत साळगावकर आदी मान्यवरांनी वारीच्या विविध अनुषंगाने विचार मांडले आहेत. विठ्ठल-रुक्म‍िणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी समितीमार्फत भक्तांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि सोलापूर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथे प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा तसेच उपाय योजनांची माहिती दिली आहे. राज्य शासनामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या वारीसंदर्भातही विशेषांकात माहिती आहे.
            हा लोकराज्यचा विशेषांक हिंगोली जिल्ह्यातील विविध विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. या अंकाची किंमत केवळ दहा रुपये इतकी असून लोकराज्य (मराठी) मासिकाची वार्षिक वर्गणी 100/- रूपये इतकी आहे. वार्षिक वर्गणी जिल्हा माहिती कार्यालय, एस-6, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दूसरा मजला, हिंगोली येथे भरता येईल. तसेच या विषयी अधिक माहितीसाठी 02456-222 635 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी आषाढी वारी संदर्भात सविस्तर माहिती करुन घेण्यासाठी लोकराज्य ‘वारी’ विशेषांक खरेदी करुन संग्रही ठेवावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने करण्यात येत आहे.

****

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन




जिल्हाधिकारी कार्यालयात
लोकमान्य टिळक यांना अभिवादन

            हिंगोली,दि.23: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (नरेगा) खुदाबक्श तडवी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
****


21 July, 2018

सन 2018-19 शालेय क्रीडा स्पर्धाकरीता बैठकीचे आयोजन


सन 2018-19 शालेय क्रीडा स्पर्धाकरीता बैठकीचे आयोजन
हिंगोली,दि.21: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, शालेय शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्यावतीने सन 2018-19 या वर्षाच्या शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धाचे आयोजन-नियोजनाकरीता तालुका निहाय क्रीडा शिक्षक, केंद्र प्रमुख, 5 ते 8 वर्ग असलेल्या शाळेतील एक शिक्षक यांच्या बैठकीचे आयोजन  करण्यात आलेले आहे.
            सदर बैठकाचे तालूका निहाय आयेाजन पुढीलप्रमाणे केले असून यात सेनगाव तालूका बैठक दि. 25 जूलै, 2018  रोजी दुपारी 12.00 वा. तोष्णीवाल महाविद्यालय, सेनगांव येथे आयोजित करण्यात आली आहे. तर औंढा (ना.) तालूका दि. 26 जूलै, 2018 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हा परिषद प्रशाला, शिरडशहापुर, वसमत  तालूका दि. 26 जूलै, 2018 रोजी दुपारी 2.30 वा. बहिर्जीस्मारक विद्यालय, वसमत, हिंगोली तालूका दि. 27 जूलै, 2018 रोजी दुपारी 12.00 वा. जिल्हा परिषद कन्या प्रशाला, हिंगोली आणि कळमनुरी  तालूक दि. 27 जूलै, 2018 रोजी दुपारी 3.00 वा. जिल्हा परिषद प्रशाला, हिंगोली येथे बैठकीचे आयेाजन करण्यात आले आहे.
सदर बैठक शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून संबंधित तालुक्यातील तालुका क्रीडा संयोजक, सर्व क्रीडा शिक्षक, केंद्र प्रमुख, 5 ते 8 वर्ग असलेल्या शाळेतील शिक्षक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
00000


20 July, 2018

अंतरराष्ट्रीय सन्मान दिवसानिमीत्त वयोश्रेष्ठ व्यक्ती पुरस्काराकरीता अर्ज करण्याचे आवाहन


अंतरराष्ट्रीय सन्मान दिवसानिमीत्त वयोश्रेष्ठ व्यक्ती पुरस्काराकरीता अर्ज करण्याचे आवाहन
        हिंगोली,दि.20: दरवर्षी 1 आक्टोंबर रोजी वयोश्रेष्ठ व्यक्तीच्या अंतरराष्ट्रीय सन्मान दिवसाच्या संमतीचा एक भाग म्हणून सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे सहकार्य करित आहे. वृध्द विशेषत: अत्यंत गरीब ज्येष्ठ नागरिकासाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या खालील श्रेण्यातंर्गत सेवा देणाऱ्यांचे प्रख्यात ज्येष्ठ आणि संस्थावरील वयोश्रेष्ठाकरीता खालील श्रेणीनुसार पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.
क्र.
श्रेणी
वर्णन/पात्रता
पुरस्काररचे स्वरूप
1
वृध्दत्वाकांशी  संशोधनासाठी सर्वोत्तम संस्था
वृध्दत्वाकांक्षाच्या क्षेत्रातील ज्ञानाचा शोध आणि प्रसार करण्यातील थकबाकीदार कामाची नोंद असलेल्या संस्थांसाठी.
1) मानपत्र
2) स्मृतिचिन्ह
3)पाच लाख रूपये रोख रक्कम
2
ज्येष्ठ नागरिकांना जागरूकता निर्माण करणे आणि सामाजिक जागरूकता निर्माण करणे
वृध्द व्यक्तिंना विशेषत: अनुचित नागरिकांना सेवा प्रदान करण्याच्या नोंदीसह संस्थेसाठी.
1) मानपत्र
2) स्मृतिचिन्ह
3)पाच लाख रूपये रोख रक्कम
3
ज्येष्ठ नागरिकांना सेवा आणि सुविधा पुरविण्यासाठी सर्वोत्तम त्रिस्तरीय पंचायत
जिल्हा ग्रामपंचायतीतील ज्यांनी वरिष्ठ नागरिकांसाठी उत्कृष्ठ काम केले आहे.
1) मानपत्र
2) स्मृतिचिन्ह
3)दहा लाख रूपये रोख रक्कम
4
ज्येष्ठ नागरिकांना सेवा आणि सुविधा पुरविण्यासाठी सर्वोत्तम शहरी  लोकल
ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्कृष्ठ काम केले आहे.
1) मानपत्र
2) स्मृतिचिन्ह
3)दहा लाख रूपये रोख रक्कम
5
पालक आणि ज्येष्ठ नागरिक कायदा 2007च्या देखभाल आणि कल्याणासाठी राबविलेल्या राज्य आणि ज्येष्ठ नागरिकांना सेवा आणि सुविधा पुरविणे
राज्याच्या किंवा केद्रशासित प्रदेशांना या कायदयाच्या तरतुदी अंमलबजावणीमध्ये पुढाकार घेण्यात आला आहेआणि त्यांच्या देखरेखीच्या दाव्याची पुर्तता किंवा वृध्दांसाठी सर्वोत्तम सुरक्षा कार्यक्रम सर्वात जास्त आहे.
1) मानपत्र
2) स्मृतिचिन्ह

6
ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व कल्याण वाढविण्यासाठी सर्वोत्तम खाजगी क्षेत्रातील संस्था
वृध्दांच्या समस्यांना संबोधित करुन त्यांना लाभदायक रोजगार प्रदान करुन किंवा त्यांच्या कौशल्याचा आणि अनुभवाचा उपयोग समाजाच्या फायदयासाठी  किंवा वृध्दांच्या वैद्यकिय संरक्षणातील पायाभुत सुविधांची निर्मिती किंवा जेष्ठ नागरिकांना कम्युनिटी म्हणुन लाभलेल्या कोणत्याही इतर तत्वावर करणे जेष्ठ शहरातील शहराच्या फायदयासाठी  घेतलेल्या कृती संघटनेच्या दैनंदिन व्यवसायापासून दुर राहतील.
1) मानपत्र
2) स्मृतिचिन्ह

7
ज्येष्ठ नागरिकाचे कल्याण व कल्याण वाढविण्यासाठी  सर्वोत्तम खाजगी  क्षेत्रातील संस्था
सार्वजनिक  क्षेत्रातील उपक्रमामधून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटीच्या माध्यमातुन आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासाठीच्या कार्यक्रमाद्वारे समाजाला सेवा देणे.
1)मानपत्र
2) स्मृतिचिन्ह

वैयक्तीक श्रेणी
8
शताब्दी
नव्वद वर्षाच्यावर असलेल्या आणि तरीही शारीरिक रित्या सक्रिय, स्वातंत्र्य आणि समाजामध्ये योगदान देण्याऱ्या पुर्नवसित व्यक्तिसाठी.
1)मानपत्र
2) स्मृतिचिन्ह
3)दोन लाख पन्नास हजार रूपये रोख रक्कम
9
प्रतिष्ठित आई
महिलांना ज्येष्ठ नागरिकांसाठी जे महान अडचणींचा सामना करतात त्यांच्या मुलांचे संगोपन करतात आणि त्यांना त्यांच्या निवडीच्या क्षेत्रातील उच्च सिध्दी बनण्यास मदत करतात.
1) मानपत्र
2) स्मृतिचिन्ह
3)दोन लाख पन्नास हजार रूपये रोख रक्कम
10
आजीवन कामगिरी
सत्तर वर्षापूर्वी ज्येष्ठ नागरिकाने वृध्दत्वाच्या क्षेत्रात कार्य केले आहे आणि शेतात लक्षणीय योगदान केले आहे .
1) मानपत्र
2) स्मृतिचिन्ह
3)दोन लाख पन्नास हजार रूपये रोख रक्कम
11
सर्जनशिल कला
साहित्य,रंगमंच,सिनेमा,संगीत,नृत्य,चित्रकला ,शिल्पकला,फोटोग्राफी,इत्यादीच्या योेगदानासाठी राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेती करणाऱ्या विजेत्यासाठी आणि जे त्यांच्या क्षेत्रात वृध्दत्वात सक्रिय राहतात.
1) मानपत्र
2) स्मृतिचिन्ह
3)दोन लाख पन्नास हजार रूपये रोख रक्कम
12
खेळ आणि साहसी (पुरुष आणि महिला साठी प्रत्येकी एक)
आंतरराष्ट्रीय जबरदस्त ज्यांनी जिंकले आहे आणि जे क्रिडा क्षेत्रात योगदान देत आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना.
1)मानपत्र
2) स्मृतिचिन्ह
3)दोन लाख पन्नास हजार रूपये रोख रक्कम
13
धैर्य आणि शौर्य(पुरुष आणि महिला साठी प्रत्येकी एक)
ज्येष्ठ नागरिकाकडे गंभीर धोक्याच्या धक्क्यात अतिरिक्त सामान्य धैर्य प्रदर्शित केले आहे.
1)मानपत्र
2) स्मृतिचिन्ह
3)दोन लाख पन्नास हजार रूपये रोख रक्कम
            जिल्ह्यातील वृध्द विशेषत: अत्यंत गरीब ज्येष्ठ नागरिकांनी उल्लेखनीय कार्य केलेल्या वरील श्रेण्यातंर्गत दि. 25 जूलै, 2018 पर्यात पुरस्कारसाठी समाज कल्याण विभाग, हिंगोली यांच्याकडे अर्ज करावे, असे सहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण,हिंगोली यांनी कळविले आहे.
****