16 December, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 04 रुग्ण ; तर 12 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


35 रुग्णांवर उपचार सुरु

 

         हिंगोली,दि. 16 : जिल्ह्यात 04 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 02 व्यक्ती तर कळमनुरी परिसरात 01 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 12 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 03 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे़, सद्य:स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 446 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 359 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 35 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 52 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*****

अल्पसंख्यांक हक्क दिवस ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 


 

         हिंगोली,दि. 16: संयुक्त राष्ट्र संघटनेने दि. 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वंशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करुन प्रस्तृत केला आहे. त्यानुसार दरवर्षी 18 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस  साजरा केला जातो. त्यास अनुसरुन अल्पसंख्यांक विकास विभाग यांनी कोव्हिड-19 च्या विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र/राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार लोक सहभागाबाबत देखील 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून ऑनलाईन/वेबिनार इत्यादी पध्दतीने साजरा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच या दिवसाच्या निमित्ताने अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीवा किंवा माहिती करुन दिली जाणार आहे.

            त्या अनुषंगाने दि. 18 डिसेंबर, 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या मार्फत https://meet.google.com/owz-pahb-vxv या लिंकवर ऑनलाईन/वेबिनारवर साजरा करण्यात येत आहे. अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांनी वरील लिंकवर जॉईन होऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

14 December, 2020

कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेवूनच अल्पसंख्यांक हक्क दिन 18 डिसेंबरला साजरा करावा

 


हिंगोली दि. 14 :- कोव्हिड-19 विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार लोकसहभागाबाबत योग्य ती खबरदारी घेऊनच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाने शुक्रवार 18 डिसेंबर 2020 हा दिवस “अल्पसंख्यांक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

            कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना व्याख्याने, चर्चासत्रे ऑनलाईन वेबिनार इत्यादी पध्दतीने प्रसिध्दी द्यावी. जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबवावा, असेही जिल्हाधिकारी हिंगोली कार्यालयाकडून निर्देशित करण्यात आले आहे.

0000

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन 03 रुग्ण ; तर 05 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज

 


48 रुग्णांवर उपचार सुरु

 

         हिंगोली,दि. 14 : जिल्ह्यात 03 नवीन कोविड-19 रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती व वसमत परिसरात 01 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती असे एकूण 03 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 05 कोविड-19 रुग्ण बरा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 03 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे़, सद्य:स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 440 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 340 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 48 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 52 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*****

निवडणूक लढविणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्राबाबत हमीपत्र सादर करण्याची मूभा

 


            हिंगोली, दि. 14 : राज्य निवडणूक आयोगाने जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या हिंगोली जिल्हयातील 495 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सार्वत्रिक किंवा पोटनिवडणूक कार्यक्रमाकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक हा 28 फेब्रुवारी, 2021 किंवा त्यापूर्वीचा असेल त्याबाबतीत नामनिर्देशनपत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र सादर करण्याची मूभा उमेदवारांना दिली आहे.

            राज्य निवडणूक आयोगाने दि. 11 डिसेंबर, 2020 रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांकडून विहित नमुन्यातील हमीपत्र व जातपडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती घेवून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार सर्व संबंधित निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, अशा सूचना  जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी दिल्या आहेत.

******

जिल्हयातील 495 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर - प्र. जिल्हाधिकारी शंकर बरगे

 


* आदर्श आचार संहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश

 

हिंगोली, दि. 14:- राज्य निवडणूक आयोगाने जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या हिंगोली जिल्हयातील 495 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याने संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये शुक्रवार,             दि. 11 डिसेंबर, 2020 पासून आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायत निवडणूका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणामध्ये होणे आवश्यक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता विषयक वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे, निवडणुकांचे कार्यान्वयन करण्याबाबत वेळोवेळी दिलेले आदेश व निवडणूक कार्यक्रमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्र. जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रि‍क निवडणुकांकरीता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम पूढील प्रमाणे आहे. तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक 15 डिसेंबर, 2020 (मंगळवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दि. 23 डिसेंबर, 2020 (बुधवार) ते 30 डिसेंबर, 2020 (बुधवार) वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत (दिनांक 25,26 व 27 डिसेंबर, 2020 ची सार्वजनिक सुटी वगळून). नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)   दि. 31 डिसेंबर, 2020 (गुरुवार) वेळ सकाळी 11.00 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत.  नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दि. 04 जानेवारी, 2021 (सोमवार) दुपारी 3.00 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दि. 04 जानेवारी 2021 (सोमवार) दुपारी 3.00 वा.नंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दि. 15 जानेवारी, 2021 (शुक्रवार) सकाळी 7.30 वा.पासून ते सायंकाळ 5.30 पर्यंत. मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील.). दि. 18 जानेवारी 2021 (सोमवार) व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 21 जानेवारी 2021 (गुरुवार) पर्यंत आहे.

******

11 December, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 02 रुग्ण ; तर 07 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज 53 रुग्णांवर उपचार सुरु

 

         हिंगोली,दि. 11 : जिल्ह्यात 02 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती, सेनगांव परिसरात 01 व्यक्ती असे एकूण 02 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 07 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 04 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे़, सद्य:स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 431 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 326 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 53 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 52 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*****