28 October, 2024

पाचव्या दिवशी हिंगोली जिल्ह्यात 115 अर्जांची उचल

• वसमत येथे 27, कळमनुरी येथे 18, हिंगोली येथे 19 नामनिर्देशनपत्र दाखल • नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस हिंगोली (जिमाका), दि. 28 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये आज हिंगोली जिल्ह्यात 63 इच्छुकांनी 115 अर्जांची उचल केली आहे. तर 64 जणांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. आज नामनिर्देशन प्रकियेच्या पाचव्या दिवशी 92-वसमत विधानसभा मतदार संघात 16 इच्छूक उमेदवारांनी 21 अर्ज, 94-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 21 इच्छूक उमेदवारांनी 36 अर्ज व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघात 26 इच्छूक उमेदवारांकडून 58 अर्ज असे जिल्ह्यात एकूण 63 इच्छुकांकडून 115 अर्जांची उचल झाली आहे. 92-वसमत विधानसभा मतदारसंघात आज 18 उमेदवाराचे 27 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. यामध्ये 1) रावसाहेब दाडेगांवकर सांळूके यांनी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार) पक्ष-2 व अपक्ष-2 असे एकूण 4 अर्ज, 2) नाथराव तातेराव कदम (अपक्ष) 2 अर्ज, 3) श्रीमती राजश्री नाथराव कदम (अपक्ष) 2 अर्ज, 4) मारोती रामराव क्यातमवार यांनी इंडियन नेशनल काँग्रेस पक्ष-1 व अपक्ष-1 असे 2 अर्ज, 5) बाबुराव उर्फ बबन रामचंद्र दिपके (अपक्ष)-1, 6) नावनाथ साहेबराव कुऱ्हे (अपक्ष) -1 , 7) रघुनाथ सुभानजी सुर्यवंशी (अपक्ष) -2 अर्ज, 8) बाळासाहेब नामदेव मगर (अपक्ष) - 1, 9) विष्णु उत्तम जाधव (अपक्ष)-1, 10) बांगर रामप्रसाद नारायणराव (अपक्ष)-1, 11) श्रीमती उज्वलाताई तांभाळे यांनी भाजपा-1 व अपक्ष-1 असे 2 अर्ज, 12) मिलिंद राजकुमार यंबल (अपक्ष)-2 अर्ज, 13) रामचंद्र नरहरी काळे (अपक्ष)-1, 14) शेख फरीद उर्फे मुनीर इसाक पटेल (अपक्ष)-1, 15) गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज (जनसुराज्य शक्ती)-1, 16) अंकुश तातेराव आहेर (अपक्ष)-1, 17) श्रीमती प्रिती मनोज जयस्वाल (वंचित बहूजन आघाडी)-1, 18) पुष्पक रमेशराव देशमुख (अपक्ष)-1 अशा 18 इच्छूक उमेदवारांनी 27 नामनिर्देशपत्र दाखल केले आहेत. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 14 उमेदवाराचे 18 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. यामध्ये 1) सुनिता सजन निरगुडे (अपक्ष)-1, 2) शिवाजी बाबूराव सवंडकर (अपक्ष)-2, 3) रविंद्र गणपतराव थोरात (अपक्ष)-1, 4) नामदेवराव ग्यानोजी कल्याणकर (अपक्ष)-1, 5) अजित उत्तमराव मगर (अपक्ष)-1, 6) संतोष टारफे (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे)-2, 7) बुध्दभुषण वसंत पाईकराव (अपक्ष)-1, 8) गोदावरी संतोषराव बांगर (अपक्ष)-1, 9) संतोष लक्ष्मणराव बांगर (शिवसेना)-1, 10) बाजीराव बाबूराव सवंडकर (अपक्ष)-1, 11) संतुक दत्तराव कदम (अपक्ष)-2, 12) संजय तुळशीराम लोंढे (अपक्ष)-2, 13) संतोष लक्ष्मण टार्फे (अपक्ष)-1, 14) दिलीप तातेराव मस्के (वंचित बहुजन आघाडी)-1 अशा 14 इच्छुक उमेदवारांनी 18 नामनिर्देशन दाखल केले आहेत. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 16 इच्छुक उमेदवारांनी 19 नामनिर्देशन दाखल केले आहे. यामध्ये 1) डॉ.विठ्ठल नथुजी रोडगे (अपक्ष)-2, 2) सर्जेराव निवृत्ती खंदारे (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी)-1, 3) शिवशंकर शेषेराव वाबळे (अपक्ष)-1, 4) अंबादास सुकाजी गाडे (वंचित बहुजन आघाडी व अपक्ष)-2, 5) विमलकुमार शुभाषचंद्र शर्मा (अपक्ष)-1, 6) प्रमोद सखारामजी कुटे (मनसे)-1, 7) तान्हाजी सखारामजी मुटकुळे (भारतीय जनता पार्टी)-2, 8) विठ्ठल लिंबाजी मुटकुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)-1, 9) सत्तार पठाण काशिम पठाण (अपक्ष)-1, 10) माधव बळीराम कोरडे (अपक्ष)-1, 11) साहेबराव किसनराव सिरसाठ (बसपा)-1, 12) रमेश विठ्ठलराव शिंदे (अपक्ष)-1, 13) शिवाजी लोडजी बल्लाळ (अपक्ष)-1, 14) दीपक धनराज धुरिया (भारतीय जनसम्राट पार्टी)-1, 15) सुनिल दशरथ इंगोले (भिमसेना)-1 आणि 16) पंजाब नारायण हराळ (राष्ट्रीय समाज पक्ष)-1 असे एकूण 16 उमेदवारांनी 19 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. अंबादास गाडे, विठ्ठल मुटकुळे, साहेबराव सिरसाठ आणि पंजाब हराळ या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रासोबत पक्षाचा एबी फॉर्म सद्यस्थितीत जोडलेला नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. मंगळवार (दि.22) पासून राज्यात निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, नामनिर्देशन पत्र विक्री व दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी 153 अर्जांची विक्री झाली. दुसऱ्या दिवशी बुधवारी 123, तिसऱ्या दिवशी गुरुवारी 58 अर्ज, चौथ्या दिवशी शुक्रवारी 92 अर्ज, तर आज पाचव्या दिवशी सोमवारी 63 इच्छुकांकडून 115 अर्जांची विक्री झाली आहे. अशा पाच दिवसात जिल्ह्यात 541 अर्जांची विक्री झाली आहे. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा उद्या मंगळवार, दि. 29 ऑक्टोबर 2024 करता येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे. यावेळी 92-वसमत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय आधिकारी तथा उपविभागीय आधिकारी प्रतिक्षा भुते, 94-हिंगोली विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तसेच संबंधित विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 अर्ज घेता येतात. नामनिर्देशनपत्रे 29 ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. बुधवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर 4 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. ********

No comments: