18 October, 2024

जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

हिंगोली, दि.18 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात यासाठी हिंगोली जिल्हा मुख्यालयात 24X7 तास कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता काळामध्ये पैसे, मद्य अथवा मौल्यवान वस्तू यांची अवैधपणे वाहतूक किंवा हालचाल होत असल्यास तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे कृत्य होत असल्याची विश्वसनीय माहिती असल्यास कोणत्याही नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1950 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. *******

No comments: