17 October, 2024

खाजगी व्यक्तींच्या जागेवर, सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 15 ऑक्टोबर, 2024 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी, त्यांच्या प्रतिनिधी, हितचिंतकानी निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे यासाठी कोणत्याही व्यक्तीगत, खासगी जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादींचा संबंधित जागा मालकाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी अभिनव गोयल यांनी निर्बंध घातले आहेत. ***

No comments: