23 October, 2024
निवडणूक निरीक्षक (खर्च) अर्जुन प्रधान यांची जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्षाला भेट
हिंगोली (जिमाका), दि. 23: निवडणूक निरीक्षक (खर्च) अर्जुन प्रधान यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्षाला भेट देऊन पाहणी केली. पथक प्रमुख ग. गो. चितळे यांनी निवडणूक कालावधीमध्ये या कक्षाचे कामकाज 24X7 सुरू असून, तक्रार निवारण कक्षातील कार्यान्वित 1950 या निशुल्क क्रमांकावर येणाऱ्या कॉल्सची तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती दिली.
जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्षाकडे आतापर्यंत 1950 निशुल्क क्रमांकावर 14 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या सर्व तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यात आल्याचे पथकप्रमुख श्री. चितळे यांनी सांगितले. निवडणूक निरीक्षक अन्वर अली यांनी येथील कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत निवडणूक कालावधीत या कक्षाने अधिक सक्रियपणे काम करण्याच्या सूचना दिल्या.
निवडणूक निरीक्षकांनी जिल्हा सूचना केंद्रामध्ये स्थापन करण्यात आलेल्या तांत्रिक कक्षाला भेट देऊन ई-एसएमएस, सी-व्हिजील ॲपची माहिती घेतली. यावेळी पथकप्रमुख अब्दुल बारी यांनी याबाबत त्यांना माहिती दिली. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment