29 October, 2024
निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांची हिंगोली विधानसभेच्या विविध कक्षाला भेट देऊन पाहणी
हिंगोली (जिमाका), दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती वंदना राव यांची निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून नियुक्ती केली आहे.
श्रीमती वंदना राव यांनी आज 94- हिंगोली विधान सभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय येथे आदर्श आचार संहिता कक्ष, प्रसार माध्यम कक्ष, मतपत्रिका टपाली, सर्व्हिस वोटर, वाहतूक कक्ष, परवाना कक्ष, लेखाविषयक, मतदान साहित्य कक्ष, नामनिर्देशन कक्ष इत्यादी विभागाला भेट देऊन पाहणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी हिंगोली शहरातील 15 मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी मुख्याधिकारी तथा नोडल अधिकारी अरविंद मुंढे, शहर अभियंता प्रतीक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळु बांगर, नोडल अधिकारी पंडीत मस्के, विद्युत अभियंता वसंत पुतळे, राजेश पदमणे, शिवाजी पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment