17 October, 2024
धरणे, आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध
हिंगोली (जिमाका), दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 15 ऑक्टोबर, 2024 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
हिंगोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून सभा, मिरवणुका, निवडणूक प्रचार इत्यादी बाबी नियंत्रित करणे आवश्यक असल्याने जिल्हा दंडाधिकारी अभिनव गोयल यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निवडणूक कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसील कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृह या ठिकाणी सार्वजनिक व रस्त्यावर धरणे, आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर घालण्याचे आदेश दिले आहेत.
हे आदेश दि. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत लागू राहणार आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment