17 October, 2024

पक्षांची चित्रे, चिन्हांचे कापडी फलके सार्वजनिक ठिकाणी लावण्यावर निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 17: भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 15 ऑक्टोबर, 2024 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून संबंधित पक्षांचे चित्रे, चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यावर निर्बंध घालणे आवश्यक आहे. तसेच सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकूण घेणे सद्य परिस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी अभिनव गोयल यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये संबंधित पक्षांचे चित्रे, चिन्हांचे कापडी फलके सार्वजनिक ठिकाणी लावता येणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत लागू केले आहेत. *****

No comments: