07 October, 2024

वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका),दि.07 : माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दि. 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निर्णयास अनुसरुन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळ, सार्वजनिक उपक्रम आदी कार्यालयाने विविध उपक्रमाचे आयोजन करुन वाचन प्रेरणा दिन साजरा करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांनी केले आहे. ******

No comments: