10 October, 2024
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सायकल खरेदी अर्थसहाय्यासाठी सोमवारी होणार ईश्वर चिठ्ठीद्वारे लाभार्थ्यांची निवड
• पात्र लाभार्थ्यांनी निवडीच्या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 10 : जिल्हा परिषद सेस योजना सन 2024-25 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल खरेदीकरिता अर्थसहाय्य पुरवणे या योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी पंचायत समितीकडून अर्ज मागविण्यात आले होते. पात्र लाभार्थ्यांमधून ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करावयाची आहे. ही निवड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहामध्ये सोमवारी (दि.14) दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहे.
या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी निवडीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन निवड समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, सह अध्यक्ष तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, सदस्य सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके व निवड समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment