17 October, 2024

निवडणूक कालावधीमध्ये जात, धर्म, भाषावार शिबिरांच्या आयोजनास निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि.17 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 15 ऑक्टोबर, 2024 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. तसेच सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकूण घेणे सद्य परिस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक आहे. हिंगोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीमध्ये कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धर्म, भाषावाद शिबिरांचे आयोजनावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी अभिनव गोयल यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये दिले आहेत. हे आदेश दि. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत लागू राहणार आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ******

No comments: