13 October, 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार लिंक करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका),दि.13: जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून, या योजनेमध्ये जिल्ह्यातील महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यानुसार महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरावरून महिलांचे प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. यामध्ये महिलांचे आधार कार्ड, बँक पासबुक फोटोसह प्रस्तावाचा समावेश आहे.
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात डीबीटीद्वारे दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जात आहे. परंतु पात्र महिलेच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यासाठी त्यांचे खात्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. यापूर्वी देखील महिलांचे बँक खात्याला आधार लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या पात्र महिलांनी अद्यापही बँक खात्याशी आधार लिंक केलेले नाहीत, त्या महिलांनी लवकरात लवकर बँक खात्याशी आधार लिंक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment