08 October, 2024

हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आज उद्घाटन • कार्यक्रमाचे दूरदृश्यप्रणालीव्दारे उद्घाटन

हिंगोली (जिमाका), दि.08 : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अधिनस्त हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन उद्या दि. 9 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण व आयुष (स्वतंत्र पदभार) राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि रसायने व खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री तथा अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार, मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सर्वश्री. सतीश चव्हाण, विक्रम काळे, डॉ. प्रज्ञाताई सातव, तान्हाजी मुटकुळे, चंद्रकांत (राजूभैय्या) नवघरे, संतोष बांगर, वैद्यकीय शिक्षण व आयुषचे अध्यक्ष राजीव निवतकर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांनी केले आहे. ******

No comments: