17 October, 2024

नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून, दि. 15 ऑक्टोबर, 2024 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे. नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे. आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे या बाबीवर निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिनव गोयल यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्हादंडाधिकारी अभिनव गोयल यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहेत. **

No comments: