17 October, 2024

शासकीय परिसरात संबंधित पक्षांचे चित्र, चिन्हांचे कापडी फलके, भाषण देण्यास निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात संबंधित पक्षांचे चित्र, चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यास निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश 25 नोव्हेंबरपर्यंत अंमलात राहणार आहेत. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक कार्यक्रम 15 ऑक्टोबर रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त, न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसील कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने संबंधित पक्षांचे चित्र, चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 25 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी श्री. गोयल यांनी दिले आहेत. ******

No comments: