17 October, 2024

सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करण्यास निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 15 ऑक्टोबर, 2024 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्या कालावधीत र्साजनिक मालमत्तेचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष विद्रुपीकरण करण्यास निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत. सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्य परिस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक आहे. हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपीकरण करण्यास भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिनव गोयल यांनी निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत लागू केले आहेत. ******

No comments: