18 October, 2024

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी घेतला राष्ट्रीय कार्यक्रमाचा आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी जिल्हा प्रशिक्षण संघ जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे नुकतीच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या बैठकीत सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाचा सखोल आढावा घेऊन मार्गदर्शन केले. या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ.सय्यद मुजीब यांनी आढावा घेत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडूरंग फोपसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी आढावा घेऊन मार्गदर्शन केले लसीकरण स्थळी घटना घडल्यास त्वरित आपल्या वरिष्ठांना कळवून सौम्य, मध्यम, तीव्र या प्रकारात वर्गीकरण करून लगेच रिपोर्टिंग करणे, नियमित लसीकरण व बीसीजी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविणे, कुटूंब कल्याण शिबीर आयोजित करणे, एनसीडी कार्यक्रम, कीटक जन्य व जलजन्य आजार याबाबत सखोल आढावा घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाबाबत सकाळच्या सत्रात जिल्हास्तरीय वर्कशॉप घेण्यात आले. त्याच बरोबर आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करून मुख्यालयी वास्तव्य करून राहण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी बैठकीत दिल्या. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा कुपास्वामी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा महाले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कल्पना सुनमकारी, डॉ. अरुणा दहिफळे, डॉ. काळे, डॉ.जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. संदीप काळे, डॉ.अनुराधा गोरे, अमोल कुलकर्णी, मुनाफ शेख, सुनील मुनेश्वर, मनीषा वडकुते, वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: