29 October, 2024

सजग नागरिकांनो, अवैध रोख रक्कम, मद्य, अंमलीपदार्थ विरुद्ध सी-व्हिजीलवर तक्रार नोंदवा - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली, (जिमाका) दि.29 : जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या निवडणूक काळात अवैध रोख रक्कम (रोकड), मद्य, ड्रग्ज, गांजा आदी अंमली पदार्थांचा गुप्त साठा, वितरण आणि वाहतुकीविषयी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात अवैधरित्या दारु, रोख रक्कम (रोकड), गांजा, ड्रग्ज आदींचा गुप्त साठा, वाहतूक आणि वितरण केले जात असल्याच्या घटना घडतात. याविरुद्ध कारवाई करण्यासाठी यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. सुजाण नागरिकांनी अशा घटना निदर्शनास आल्यास प्रशासनाला तत्काळ कळवावी. याशिवाय आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजील ॲप उपलब्ध केला असून त्याद्वारेही तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. सीव्हिजील ॲप येथून डाऊनलोड करता येईल : https://play.google.com/store/apps/details?id=in.nic.eci.cvigil *******

No comments: