22 October, 2024

युवराज पवार अथवा त्यांच्या कुटुंबियांनी निवृत्तीविषयक लाभासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

हिंगोली दि. 22 (जिमाका) : सर्वोच्च न्यायालयात दाखल अवमान याचिका क्रमांक 878/2023 नुसार तत्कालीन हजेरी सहाय्यक युवराज पवार यांना सेवा ग्राह्य निवृत्तीविषयक लाभ द्यावयाचे आहेत. याबाबत जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागाकडून माहिती घेतली असता युवराज पवार अथवा त्यांचे कुटुंबीय यांच्याशी संपर्क होत नाही. त्यामुळे याद्वारे युवराज पवार अथवा त्यांच्याशी संबंधित नातेवाईकांनी तात्काळ लेखा विभागाचे कनिष्ठ सहाय्यक खंडेराव पोटे यांच्या भ्रमणध्वनी क्र. 9307737575 वर अथवा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे. *******

No comments: