29 October, 2024
नामनिर्देशन अर्जाची आज होणार छाननी
• जिल्ह्यात बुधवारी 124 नामनिर्देशनपत्र दाखल तर 43 अर्जांची उचल
• वसमत येथे 41, कळमनुरी येथे 32, हिंगोली येथे 51
हिंगोली (जिमाका), दि. 29 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये आज (बुधवारी) शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात एकूण 124 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. तर 30 इच्छुकांनी 43 अर्जांची उचल केली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
आज नामनिर्देशन प्रकियेच्या शेवटच्या दिवशी 92-वसमत विधानसभा मतदार संघात 13 इच्छूक उमेदवारांनी 18 अर्ज, 94-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 9 इच्छूक उमेदवारांनी 12 अर्ज व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघात 8 इच्छूक उमेदवारांकडून 13 अर्ज असे जिल्ह्यात एकूण 30 इच्छुकांकडून 43 अर्जांची उचल करण्यात आली.
92-वसमत विधानसभा मतदारसंघात आज 32 उमेदवारांची 41 नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत. यामध्ये 1) राजू उर्फ प्रभाकर दत्तराव चापके (अपक्ष)-2, 2) चंद्रकांत रमाकांत नवघरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)-1 व अपक्ष-1 असे 2- अर्ज, 3) उज्वलाताई विजयप्रकाश तांभाळे (अपक्ष)-1 व (भाजपा)-1 असे 2 अर्ज, 4) ॲड. रामजी गौतम कांबळे (अपक्ष)-1, 5) नंदू बापूराव घुटे (अपक्ष)-1, 6) संदीप रमेश कदम (अपक्ष)-1, 7) गायकवाड प्रकाश सुभाषराव (अपक्ष)-1, 8) अंकुश तातेराव आहेर (अपक्ष)-2, 9) तनपुरे मंगेश शिवाजी (अपक्ष)-1, 10) खोब्राजी कांबळे (अपक्ष)-1, 11) श्यामराव व्यंकटराव चव्हाण (अपक्ष)-1, 12) प्रल्हाद रामराव राखोंडे (अपक्ष)-1, 13) गजानन भिमराव ढोबळे (अपक्ष)-1, 14) सवंडकर नंदकुमार साहेबराव (अपक्ष)-2, 15) मुंजाभाऊ विठ्ठलराव मगर (अपक्ष)-2, 16) श्रीनाथ सदाशिव साखरे (अपक्ष)-1, 17) उत्तम रावण एंगडे (अपक्ष)-1, 18) तान्हाजी गंगाराम भोसले (अपक्ष)-2, 19) आलोक हनवंता इंगोले (अपक्ष)-1, 20) नाथनाव तातेराव कदम (अपक्ष)-1, 21) नागिंदर भिमराव लांडगे (बहुजन समाज पक्ष)-1, 22) प्रिती मनोज जयसवाल (अपक्ष)-1, 23) शेख फरीद उर्फ मुनीर इसाक पटेल (अपक्ष)-2, 24) गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज (अपक्ष)-1, 25) मुंजाजी सटवाजी बेंडे (राष्ट्रीय समाज पक्ष)-1, 26) अशोक संभाजी गायकवाड (अपक्ष)-1, 27) दिगांबर गुणाजी नाईकवाडे (अपक्ष)-1, 28) प्रभावती खंदारे (अपक्ष)-1, 29) ऋषीकेश ज्ञानेश्वर बर्वे (अपक्ष)-1, 30) मझहर महेबूब शेख (समाजवादी पक्ष)-1 व अपक्ष-1 असे 2 अर्ज, 31) संभाजी सटवाजी सदावर्ते (अपक्ष)-1 आणि 32) बाळासाहेब नामदेव मगर (अपक्ष)-1 अशा 32 इच्छूक उमेदवारांनी 41 नामनिर्देशपत्र दाखल केली आहेत.
93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात आज 32 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली आहेत. तर आतापर्यंत 56 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली आहेत. यामध्ये 1) संतोष लक्ष्मणराव बांगर (शिवसेना)-2, 2) विजय माणिका बलखंडे (बहुजन समाज पक्ष)-2, 3) दिलीप तातेराव मस्के (वंचित बहुजन आघाडी)-4, 4) बुध्दभूषण वसंत पाईकराव (अपक्ष)-3, 5) संतोष अंबादास टार्फे (अपक्ष)-1, 6) रफीउल्लाखाँ अफजलखाँ पठाण (जनता दल से.)-1 व अपक्ष-1 असे 2 अर्ज, 7) सुनिता सजन निरगुडे (अपक्ष)-1, 8) शिवाजी बाबूराव सवंडकर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष)-1, अपक्ष-2 असे 3 अर्ज, 9) रविंद्र गणपतराव थोरात (अपक्ष)-2, 10) नामदेवराव ग्यानोजी कल्याणकर (अपक्ष)-1, 11) अजित उत्तमराव मगर (अपक्ष)-2, 12) संतोष टारफे (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे)-4, 13) गोदावरी संतोषराव बांगर (अपक्ष)-1, 14) बाजीराव बाबुराव सवंडकर (अपक्ष)-2, 15) संतुक दत्तराव कदम (अपक्ष)-3, 16) संजय तुळशीराम लोंढे (अपक्ष)-4, 17) संतोष लक्ष्मण टार्फे (अपक्ष)-1, 18) जयदिप साहेबराव देशमुख (अपक्ष)-1, 19) अजय भगवानराव सावंत (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे)-2, 20) देवजी गंगाराम आसोले (अपक्ष)-1, 21) ॲड. मनेश मारोती हनुमंते (अपक्ष)-1, 22) मुश्ताक इसाक शेख (हिंदुस्तान जनता पार्टी)-1, 23) प्रकाश विठ्ठलराव घुन्नर (अपक्ष)-1, 24) ॲड. रामराव आत्माराम जुंबडे (अपक्ष)-1, 25) अफजल शरीफ शेख (रिपब्लीकन सेना)-2, 26) जाबेर एजाज शेख (अपक्ष)-1, 27) उध्दव बालासाहेब कदम (अपक्ष)-1, 28) सत्तार पठाण कासिम पठाण (अपक्ष)-1, 29) मेहराज अ. शे. मस्तान शे. (ऑल इंडिया मजलिस ए इन्कलाब ए मिल्लाद)-1 व 1 अपक्ष असे 2 अर्ज, 30) पठाण जुबेर खान जब्बार खान (अपक्ष)-1, 31) बालाजी नारायणराव वानखेडे (अपक्ष)-1, 32) शेख एजाज शेख नुरमियाँ (अपक्ष)-1 अशा 32 इच्छुक उमेदवारांनी 56 नामनिर्देशन दाखल केले आहेत.
94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 40 इच्छुक उमेदवारांनी 51 नामनिर्देशन दाखल केले आहेत. यामध्ये 1) बबन पांडूरंग गलांडे (अपक्ष)-1, 2) गोविंदराव नामदेव गुठे (अपक्ष)-1, 3) ॲड. रामराव आत्माराम जुमडे (अपक्ष)-1, 4) रुपालीताई राजेश पाटील (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे)-3, 5) प्रमोद सखारामजी कुटे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)-1, 6) शे. बुऱ्हाण शे. मुन्नु प्यारेवाले (अपक्ष)-1, 7) श्यामराव आनंदराव जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष)-2, 8) सुरेश राजाराम शेळके (अपक्ष)-1, 9) ॲड. अमोल माधवराव जाधव (अपक्ष)-1, 10) गंगाधर माधवराव सरकटे (अपक्ष)-1, 11) माधव गंगाराम गाडे (अपक्ष)-1, 12) एकनाथ अर्जुनराव शिंदे (अपक्ष)-1, 13) लक्ष्मण सखारामजी पठाडे (अपक्ष)-1, 14) बद्रीनाथ संभाजी घोंगडे (अपक्ष)-1, 15) प्रकाश दत्तराव थोरात (अपक्ष व वंचित बहुजन आघाडी)-2, 16) गोविंदराव फुलाजी भवर (महाराष्ट्र राज्य समिती) -1, 17) मुख्तारोद्दीन आजिजोद्दीन शेख (अपक्ष)-1, 18) सुधीरअप्पा वैजनाथअप्पा सराफ (अपक्ष व इंडियन नॅशनल काँग्रेस)-2, 19) डॉ. विठ्ठल नथुजी रोडगे (अपक्ष)-1, 20) विठ्ठल लिंबाजी मुटकुळे (अपक्ष)-1, 21) गजानन काशिराम हेंबाडे (अपक्ष)-1, 22) सुवर्णा रमेश शिंदे (अपक्ष)-1, 23) रमेश विठ्ठल शिंदे (अपक्ष)-2, 24) सतीश रामेश्वर शिंदे (अपक्ष)-1, 25) मालती माधवराव कोरडे (अपक्ष)-1, 26) माधव बळीराम कोरडे (अपक्ष)-1, 27) शांताबाई सुरेश शेळके (अपक्ष)-1, 28) जावेद बाबू सय्यद (वंचित बहुजन आघाडी)-1, 29) पाटील भाऊराव बाबूराव (अपक्ष)-1, 30) गोविंद पांडूरंग वाव्हळ (अपक्ष)-1, 31) मोईन खयुम शेख (अपक्ष)-1, 32) विनायक श्रीराम भिसे (अपक्ष)-1, 33) रवि रामदास जाधव (अभिनव भारत जनसेवा पक्ष)-1, 34) उत्तम मारोती धाबे (अखंड हिंद पार्टी)-1, 35) मुतावल्ली पठाण अतिक खान ताहेर खान (अपक्ष व मायनॉरिटी डेमोक्रेटीक पार्टी)-2, 36) अभिजीत दिलीप खंदारे (अपक्ष)-1, 37) प्रितम अशोक सरकटे (अपक्ष)-1, 38) वैजनाथ काम्होजी पावडे (अपक्ष)-1, 39) सोपान शंकरराव पाटोडे (बहुजन भारत पार्टी)-3 आणि अ. कदीर मस्तान सय्यद (अपक्ष)-3 असे एकूण 40 उमेदवारांनी 51 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. आतापर्यंत 55 इच्छुक 81 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.
मंगळवार (दि.22) पासून राज्यात निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, मंगळवारी पहिल्या दिवशी 153 अर्जांची विक्री झाली. दुसऱ्या दिवशी बुधवारी 123, तिसऱ्या दिवशी गुरुवारी 58 अर्ज, चौथ्या दिवशी शुक्रवारी 92 अर्ज आणि पाचव्या दिवशी सोमवारी 115 अर्ज तर आज शेवटच्या दिवशी मंगळवारी 30 इच्छुकांकडून 43 अर्जांची विक्री झाली आहे. अशा सहा दिवसात जिल्ह्यात 584 अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे.
उद्या बुधवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर 4 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment