15 October, 2024

जिल्ह्यातील मुद्रणालय धारकाची आज बैठक

हिंगोली (जिमाका), दि. 15 : मा. भारत निवडणूक आयोगाने आज दि. 15 ऑक्टोबर, 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे. आदर्श आचार संहिंतेची अंमलबजावणी तसेच निवडणूक कालावधीत पोस्टर, बॅनर, हॅन्ड बिल, पॉम्पलेट इत्यादी प्रकारच्या छपाई बाबत मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांची माहिती देण्यासाठी उद्या दि. 16 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी, हिंगोली येथे जिल्ह्यातील सर्व मुद्रणालय (प्रिंटींग प्रेस) धारकाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व मुद्रणालय (प्रिंटींग प्रेस) धारकांनी बैठकीस उपस्थित राहावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली यांनी दिले आहेत. ******

No comments: