29 October, 2024
निवडणूक निरीक्षक आज घेणार यंत्रणेचा आढावा
हिंगोली, दि.२९ (जिमाका): जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरु झाली असून, इच्छुकांकडून उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या काळात
निवडणूक यंत्रणेतील सर्व पथक प्रमुखांकडून उद्या बुधवार (दि.३०) रोजी तीनही निवडणूक निरीक्षक बैठकीत कामकाजाचा आढावा घेणार आहेत. या आढावा बैठकीला जिल्ह्यातील सर्व पथक प्रमुखांनी अद्ययावत माहितीसह उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात 92- वसमत, 93- कळमनुरी व 94- हिंगोली विधानसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक-2024 ची आचारसंहिता सुरु आहे.
भारत निवडणूक आयोगाचा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून, त्याअनुषंगाने निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव, अर्जुन प्रधान आणि डॉ. राकेशकुमार बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 विषयक कामकाजाच्या अनुषंगाने आढावा बैठक दुपारी ४ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह हिंगोली येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर आढावा बैठकीमध्ये निवडणूक निरीक्षक (सामान्य/खर्च/पोलीस) यांच्याकडून निवडणूकविषयक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment