18 October, 2024
गोळीबार सरावासाठी वगरवाडी येथील क्षेत्र उपलब्ध
हिंगोली (जिमाका), दि. 18 : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33 (1) (ख) व (प) नुसार औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे वगरवाडी येथील फायरींग रेंज सर्वे नं. 25 व 29 या परिसरात दि. 27 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर, 2024 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली या गटाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा वार्षिक गोळीबार सराव व नक्षल बंदोबस्त गोळीबार सराव घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी परवानगी दिली आहे.
या कालावधीत पुढील अटीवर गोळीबार सरावासाठी मैदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे ठिकाण धोकादायक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. परिसरात गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करू नये, अशा सूचना पोलीस अधिकारी यांनी दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे संबंधित गावी सर्व संबंधितांना द्याव्यात. तसेच तहसीलदार औंढा नागनाथ व पोलीस स्टेशन हट्टा यांनी मौ. वगरवाडी फायरींग बट परिसरात दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे या आदेशाची प्रसिद्धी करावी, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment