10 October, 2024

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण

• हिंगोली येथील दोन वसतिगृहाचे लोकार्पण हिंगोली (जिमाका), दि. 10 : राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण मुलांमुलींच्या 44 शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे दि. 9 ऑक्टोबर रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यामध्ये हिंगोली येथील दोन वसतिगृहांचा समावेश आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर प्रमुख अतिथी म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे उपस्थित होते. हिंगोली येथील मुलांचे शासकीय वसतिगृह व मुलींचे शासकीय वसतिगृह प्रत्येकी 100 क्षमता असलेल्या या दोन्ही वसतिगृहाचे येथील सामाजिक न्याय भवनामध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, इतर मागास बहुजन कल्याणचे यादव गायकवाड, संत गाडगे महाराज बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य पुंडगे, सहायक लेखाधिकारी किशोरकुमार महाजन, बाळासाहेब पवार, ब्रम्हानंद गिरी, सापनर व वसतिगृहातील विद्यार्थी , विद्यार्थिंनी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरीक्षक मनीष राजुलवार, बालाजी टेंभुर्णे, वरिष्ठ लिपिक भास्कर वाकळे, बाळू पवार, जयदीप देशपांडे, उखा मुरकुटे, पंचशील कुऱ्हाडे, श्रध्दा तडकसे, रविकुमार बोक्से, प्रतिक सरनाईक, दिपाली सोनकांबळे, संजय काळे, संतोष गलांडे, मारोती इंगळे, निरजकुमार राठोड, ज्योती बिजले, आश्विनी डोंगरे, बिनाबाई कोकिणे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. *****

No comments: