27 October, 2024

हिंगोली विधानसभा: पत्रकारांसोबत पेडन्यूजबाबत चर्चासत्र

हिंगोली (जिमाका), दि. २७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार ९४- हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम कक्षात पत्रकारांना आज चर्चासत्रामध्ये पेड न्यूज व इतर अनुषंगिक बाबींची माहिती देण्यात आली. यावेळी मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल मिडीयामध्ये संभाव्य पेडन्यूजबाबत माहिती देण्यात आली. सोशल मिडिया व मुद्रीत माध्यमातील पेड न्यूज शोधणे व त्यावर कार्यवाही करणे आदी बाबींची माहिती यावेळी दिली. जिल्हा माध्यम व प्रमाणन सनियंत्रण समितीचे पथक प्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी दिली. यावेळी सर्व पत्रकार बांधवासोबत सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, श्रीमती आशा बंडगर, कैलास लांडगे यांच्यासह माध्यम कक्षात नियुक्त कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: