18 October, 2024

हिंगोली विधानसभेच्या प्रसार माध्यम कक्षातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण

हिंगोली दि. 18 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार हिंगोली जिल्ह्यातील 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे स्थापन करण्यात आलेल्या प्रसार माध्यम कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी माध्यम व प्रमाणन समितीची रचना, पेड न्यूज, मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल मिडीया यासाठी जाहिरातीचे प्रमाणन करणे तसेच त्याअनुषंगाने पाठवावयाचे अहवाल व त्यांच्या नमुन्याची माहिती, सोशल मिडिया व मुद्रीत माध्यमातील पेड न्यूज शोधणे व त्यावर कार्यवाही करणे आदी बाबींची माहिती या प्रशिक्षणामध्ये जिल्हा माध्यम व प्रमाणन सनियंत्रण समितीचे पथक प्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते आणि जिल्हास्तरीय प्रशिक्षण समितीचे दीपक कोकरे यांनी सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी हिंगोली विधानसभा प्रसार माध्यम कक्षातील पंडित मस्के, आर. व्ही. बांगर, डी. पी. वर्मा, रवि गायकवाड, कुणाल कांबळे तसेच जिल्हा माध्यम प्रमाणन कक्षातील जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मारोतराव पोले, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी आदी उपस्थित होते. *****

No comments: