25 October, 2024
चौथ्या दिवशी हिंगोली जिल्ह्यात 92 अर्जांची उचल • वसमत येथे एक, कळमनुरी येथे पाच, हिंगोली येथे 11 नामनिर्देशनपत्र दाखल
हिंगोली (जिमाका), दि. 25 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये आज हिंगोली जिल्ह्यात 45 इच्छुकांनी 92 अर्जांची उचल केली आहे. 17 जणांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
आज नामनिर्देशन प्रकियेच्या चौथ्या दिवशी 92-वसमत विधानसभा मतदार संघात 14 जणांनी 27 अर्ज, 94-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 14 जणांनी 19 अर्ज व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघात 17 जणांकडून 46 अर्ज असे जिल्ह्यात एकूण 45 इच्छुकांकडून 92 अर्जांची उचल झाली आहे.
तसेच 92-वसमत विधानसभा मतदारसंघात चापके राजू ऊर्फ प्रभाकर दत्तराव (अपक्ष) यांनी 1, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 5 जणांनी नामनिर्देशन दाखल केले आहे. यामध्ये विजय माणिका बलखंडे (बहुजन समाज पक्ष), दिलीप तातेराव मस्के (वंचित बहुजन आघाडी), बुध्दभूषण वसंत पाईकराव (अपक्ष), संतोष अंबादास टार्फे (अपक्ष), रफीउल्लाखाँ अफजलखाँ पठाण यांचा समावेश आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 8 जणांनी 11 नामनिर्देशन दाखल केले आहे. यामध्ये पाटील भाऊराव बाबुराव-01, तान्हाजी सखारामजी मुटकुळे-02, सुनिता सजन निरगुडे-01, रामदास शिवराज पाटील-02, प्रकाश दत्तराव थोरात-02, आनंद राजाराम धुळे-01, डॉ. विठ्ठल नथुजी रोडगे-01 व अशोक धोंडबा कांबळे यांनी 01 असे एकूण 8 उमेदवारांनी 11 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
मंगळवार (दि.22) पासून राज्यात निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, नामनिर्देशन पत्र विक्री व दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी 153 अर्जांची विक्री झाली. दुसऱ्या दिवशी बुधवारी 123, तिसऱ्या दिवशी 58 अर्ज तर आज चौथ्या दिवशी 45 इच्छुकांकडून 92 अर्जांची विक्री झाली आहे. अशा चार दिवसात जिल्ह्यात 426 अर्जांची विक्री झाली आहे. मंगळवार, दि. 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे.
यावेळी 92-वसमत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय आधिकारी तथा उपविभागीय आधिकारी प्रतिक्षा भुते, 94-हिंगोली विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तसेच संबंधित विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 अर्ज घेता येतात. नामनिर्देशनपत्रे 29 ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. बुधवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर 4 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment