31 October, 2024

कमी आर्द्रता असलेले व एफएक्यू दर्जाचे सोयाबीनच खरेदी केंद्रावर विक्रीस आणावेत

हिंगोली, (जिमाका) दि. 31 : सोयाबीन आर्द्रता मोजण्यासाठी खरेदी केंद्रावर जे शेतकरी सोयाबीनचे नमुने घेऊन येतील त्यांना तात्काळ मॉईश्चर तपासून द्यावेत, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी सर्व खरेदी संस्थांना केले आहे. तसेच गावोगावी आपल्या कर्मचाऱ्यांना आर्द्रतामापक यंत्रासह पाठवून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सोयाबीन शेतमालाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात यावे. तसेच 12 टक्के मॉईश्चर पेक्षा कमी आर्द्रता असलेले व एफएक्यू दर्जाचे सोयाबीनच खरेदी केंद्रावर विक्रीस आणावेत, यासाठी शेतकरी बांधवांना आवाहन करावेत. तसेच त्यांना सोबत माहितीपत्रकही वाटप करावेत, असे आवाहन सर्व खरेदी संस्थांना करण्यात आले आहे. *******

No comments: