18 October, 2024

जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्ट्राँग रुम व आवश्यक सुविधाची कार्यवाही पूर्ण करावी

हिंगोली दि. 18 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष मतदानासाठी वापरण्यात येणारी एफएलसी ओके मतदान यंत्रे प्रथमस्तरीय सरमिसळ प्रक्रियेनंतर हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघांना दि. 22 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत (सिग्रेगेशन) करून वाटप करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या वाहनावर जीपीएस यंत्र बसवल्याची खात्री करण्यात यावी. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वाहनाचा नोंदणी क्रमांक, वाहन चालकाचे नाव यांची अद्ययावत माहिती ठेवून जिल्हा निवडणूक कार्यालयास कळविण्यात यावे. वाहतूक करण्यात येणारे मतदान यंत्रासोबत आवश्यक तो पोलीस बंदोबस्तासह तयार ठेवून पोलीस यंत्रणेशी संपर्कात रहावे. मतदान यंत्र स्ट्राँगरुमला पोहचल्यानंतर मतदान यंत्रे व्हीडीओ शुटींगसह स्ट्राँगरुममध्ये ठेवून सिलंबद करावे. इव्हीएम मॅन्यूअलनुसार स्ट्राँगरूम तयार करणे, मतदान यंत्र वाहतूक व साठवणूक करणे याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत. मतदान यंत्रांचे प्रथमस्तरीय सरमिसळीकरण शनिवारी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष मतदानासाठी वापरण्यात येणारी एफएलसी ओके मतदान यंत्रे प्रथमस्तरीय सरमिसळ प्रक्रिया दि. 19 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. ही मतदान यंत्रे हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघांना दि. 22 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत (सिग्रेगेशन) करून वाटप करण्यात येणार आहे. यासाठी इव्हीएम मॅन्युअलमधील निर्देशानुसार व निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार सुव्यवस्थित स्ट्राँगरुम तयार करून प्रमाणपत्रासह अहवाल दि. 20 ऑक्टोबर, 2024 रोजी दुपारी 2 वाजेपूर्वी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयास सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत. *****

No comments: