17 October, 2024

सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यास निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 15 ऑक्टोबर, 2024 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी, त्यांच्या प्रतिनिधींनी, हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होड्रिंग्ज, कमानी लावणे या व इतर बाबींमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी अभिनव गोयल यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत निर्बंध घातले आहेत. ***

No comments: