08 October, 2024
हिंगोली तालुक्यातील युवक व युवतीसाठी 'वेल्डींग वर्क'चे मोफत प्रशिक्षण
• सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुकांनी शनिवारपर्यंत नाव नोंदणी करावी
हिंगोली (जिमाका), दि. 08 : येथील जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने विशेष घटक योजनेंतर्गत हिंगोली तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवक, युवतीसाठी फूड प्रोसेसिंग या विषयावर मोफत वेल्डींग वर्क प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी उमेदवार हा किमान आठवी पास असावा, त्याचे वय 18 ते 45 वर्षादरम्यान असावे. तसेच आधार कार्ड, तीन पासपोर्ट फोटो, टीसी, मार्क मेमो, बँक पासबूक जमा करुन आपली नाव नोंदणी दि. 12 ऑक्टोबर, 2024 पर्यंत करावी. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी आयोजक सुभाष बोरकर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment