22 October, 2024

हिंगोली व परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्ह्यातील वसमत तालुक्यात काही गावात आज मंगळवार, (दि.22) रोजी सकाळी 6 : 52 वाजेदरम्यान भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालय (IMD), नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावरून जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रास प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड जिल्ह्यातील सावरगाव येथील असून, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 अशी नोंदविण्यात आली आहे. या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. तसेच भूकंप होण्याआधी, दरम्यान व भूकंप झाल्यानंतर नागरिकांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. भूकंपापूर्वी तुमचे घर भूकंपाला तोंड देऊ शकेल असे सक्षम होण्याणसाठी बांधकाम अभियंत्याोचा सल्लाज घ्यान. ग्रामीण भागात काही घरांचे छत पत्र्यांचे असून त्या पत्र्यावर आधारासाठी मोठे दगड ठेवले आहेत. तरी प्रामुख्याने अशा घरांवरचे दगड काढून त्यांना तारेच्या सहाय्याने आधार द्यावा. भूकंप प्रवणता माहिती करून घ्या आणि त्यांनुसार घरात आवश्यरक ते बदल करून घ्याच. तुमच्याा घराची आरेखने, नकाशे भविष्या्तल्याआ उपयोजनासाठी जपून ठेवा. भिंतीवरच्यात तसेच छतावरच्यार प्ला स्ट रला खोल तडे असल्याीस ते दुरूस्ता करून घ्याा. कपाटे, फडताळ भिंतीला सुरक्षि‍तपणे बांधून ठेवा, जड वस्तू‍ फडताळात खालच्या कप्यांखोल मध्येु ठेवा. विजेच्या. तसेच गॅसच्या वस्तुं ना भक्ककम आधार द्या. सुरक्षितता तसेच जीव वाचवण्याडच्या दृष्टीलने आपत्काेलीन वस्तुमसंच तयार ठेवा. कुटुंबासाठी आपत्का लीन दळणवळण आणि आपत्तीीप्रसंगी, संकटसमयी बाहेर जाण्याीचा आरखडा तयार करा. भूकंपादरम्यान सुरक्षितरित्या खाली पडा, संरक्षित व्हा, पकडा हे तंत्र शिकून घ्या . शक्यड तो बांधकामासाठी पुराच्याय ठिकाणचा नदी वा किनाऱ्यालगतचा भाग तसेच भराव टाकून विकसित केलेला भाग टाळा. भूकंपात असलेल्या. धोक्यााबद्दल स्वपत:ला तसेच कुटुंबातल्याड सर्वांना माहिती द्या. भूकंपाच्याि वेळी शांत राहा, घाबरून जाऊ नका, चार भिंतीच्याा आत वा मोकळ्या जागी असाल तर तिथेच थांबा. काडीपेटी, मेणबत्याा किंवा कोणत्या,ही प्रकारची ज्यो त वापरू नका. नादुरूस्त किंवा भंग पावलेली गॅस पाइपलाइन आणि आग एकत्र येणे योग्यं नाही. मोटारीमध्येध असाल तर गाडी तिथेच थांबवून भूकंप थांबेपर्यंत गाडीतच थांबा. टेबलखाली झोपा, एका हाताने तोंड झाका आणि भूकंपाची कंपने थांबेपर्यंत टेबल धरून ठेवा. खिडक्या तसेच आरशांपासून लांब थांबा. जमी‍न हादरत असताना इमारत सोडून जाऊ नका. कंपन थांबल्या थांबल्या बाहेर पडा, लिफ्टचा वापर करू नका. खुल्यात जागी असाल तर इमारती, झाडे, भिंती, विजेचे खांब, विजेच्या, तारा यापासून लांब राहा. एखाद्या वाहनात असाल तर मोकळ्या जागी या आणि पुलावर थांबू नका. भूकंपरोधक बांधकाम असलेल्या सुरक्षित इमारतीत असाल, तर जमीन हादरणे थांबेपर्यंत इमारतीतच थांबा. एखाद्या कोपऱ्याचा आधार घेऊन, एखाद्या भक्कसम टेबलाखाली, पलंगाखाली लपून किंवा खिडक्याब तसेच आरशापासून लांब अशा एखाद्या आतल्याा भिंतीचा वापर करून स्वलत:ला वाचवा. इमारतीतून बाहेर जायच्यात दाराच्यार जवळ असाल तर लवकरात लवकर बाहेर पडा. एखाद्या जुन्याा कमकुवत वास्तुगत असाल तर बाहेर पडायचा सुरक्षित मार्ग लवकरात लवकर पकडा. भूकंपानंतर मोडकळलेल्याी इमारतीत प्रवेश करू नका. इमारतीखाली, राडारोड्यात अडकलात तर, काडीपेटीची काडी पेटवू नका, तोंड कापडाच्याक तुकड्याने झाकून घ्याड, मदतीसाठी एखाद्या पिंप किंवा भिंतीवर हात आपटा, शिट्टी वाजवा. शेवटचा उपाय म्ह णूनच फक्तक ओरडा, त्यायनं अंगात जीव राहील आणि‍ ऊर्जा कमी खर्च होईल. सरकते जिने किंवा लिफ्टचा वापर न करता जिने वापरा. काळजीपूर्वक चाला, तुमच्यार भोवतीच्या डोक्यावरच्या धोकादायक, अस्थिर वस्तूंाचा अंदाज घ्यार. तुम्हीख जखमी होणार नाही ना याची काळजी घ्या्. मोठ्या भूकंपानंतर अनेक छोटे धक्केल बसतात, याची जाणीव ठेवा. अफवांवर विश्वाळस ठेवू नका, त्याह पसरवू नका. तुम्हा्ला घर सोडायचच असेल तर तु्म्हीक नेमकं कुठे जाताय, याविषयीचा संदेश सोडून जा. उध्वस्त क्षेत्रात गाडी घेऊन जाऊ नका कारण मदत पुनर्वसन कामासाठी रस्याजात वरची वाहतूक खोळंबू शकते. पूल किंवा उड्डाणपूल वापरू नका कारण त्यां ची मोडतोड झालेली असू शकते, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. *******

No comments: