21 October, 2024
जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांची हिंगोली विधानसभा मतदार संघ कार्यालयातील विविध समिती कक्षाला भेट
हिंगोली दि. 21 (जिमाका) : जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात उद्या दि. 22 ऑक्टोबर, 2024 पासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरु होणार आहे. या पावर्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी 94- हिंगोली विधानसभा मतदार संघ कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती कक्षाला भेट देऊन पाहणी केली. तसेच त्यांना मार्गदर्शनही केले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, हिंगोली विधानसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत भुजबळ, सखाराम मांडवगडे, मुख्याधिकारी अरविंद मुंढे आदी उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment